मागच्या काही दिवसात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता मागच्या दोन-तीन दिवसात (two-three days) पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. राज्यातील विविध भागात पाऊस कोसळत आहे.
शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती पिकांसह व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरचीला (Chili Peppers) मोठा फटका बसला आहे. यामुळे सध्या शेतकरी (farmers) आणि व्यापारी चिंतेत आहेत.
नंदूरबार जिल्ह्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. याचा शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. कोट्यावधी रुपयांच्या लाल मिरचीचे नुकसान झालं आहे. त्यामुळं या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मिथुन, मीन, कन्या राशीच्या लोकांना मिळणार चांगली संधी; नशिबाचीही साथ लाभणार
यासह व्यापाऱ्यांना देखील नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मिरची व्यापारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या मिरचीला विमा सुरक्षा कवच (Insurance protection cover) द्यावे परतीचा पाऊस आणि आवकळी पाऊस यामुळे मोठे नुकसान होत असते.
पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून आज 15 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांनी केली मागणी
जिल्ह्यात पावसामुळे मिरचीसह कापूस, ज्वारी आणि सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणखी दोन दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यामुळं आणखी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या (farmers) नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी. तसेच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातील खरीप हंगाम वाया गेल्याने सरकारने सरसकट एक रकमी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
दिलासादायक बातमी! कांद्याच्या बाजारभावात सुधारणा; किती मिळतोय बाजारभाव? जाणून घ्या
सावधान! तुम्ही नकली आले तर वापरत नाही ना? असे ओळखा अस्सल आणि नकली आले
दिलासादायक! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वाटप
Published on: 09 October 2022, 12:40 IST