ग्रामीण शेतकरी महिलांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या शेती व्यवसायाला बळकटी मिळावी, या उद्देशाने नवी मुंबई शहरात तांदूळ आणि आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई येथे उमेद अभियानाच्या वतीने ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांच्या शेतातील उत्पादनांचा हा महोत्सव असणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - उमेद च्या राज्यभरातील स्वयंसहाय्यता गटांच्या शेतातील उत्पादनाच्या आधारित तांदूळ आणि आंबा महोत्सव दिनांक २०, २१ आणि २२ मे रोजी 'पुणे विद्यार्थी गृह'चे विद्याभवन हायस्कुल, नेरूळ येथे आयोजित केला आहे. या महोत्सवाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
बचत गटांची उत्पादने शहरी भागात अधिकाधिक विक्री होण्यासाठी त्या उत्पादनांचा दर्जा, मांडणी आणि सजावटीसह पॅकेजिंगकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत 'उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना'चे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी व्यक्त केले. नवी मुंबई नेरुळ या ठिकाणी असलेल्या विद्याभवन शाळेच्या आवारात उमेद अंतर्गत स्थापित महिला स्वयंसाह्ययता समुहांनी पिकवलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी कोकण विभागीय माहिती उपसंचालक, डॉ. गणेश मुळे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या उपसंचालक शीतल कदम, पुणे विद्यार्थी गृह, विद्याभवन शैक्षणिक संकुलाचे संचालक दिनेश मिसाळ, स्माईलस् फाउंडेशनचे कार्यवाहक धीरज आहुजा आणि अध्यक्ष श्रीमती उमा आहुजा तसेच स्माईलस् फाउंडेशनचे सदस्य शालिनी विधानी, शेफाली नायर, सुरजित सिंग आदि मान्यवर उपस्थित होते. स्थानिक स्तरावरील बचत गटांनी आपल्या उत्पादनांचा दर्जा वाढविण्याकडे लक्ष द्यावे.
अतिरिक्त उसाचा प्रश्न कोणामुळे? शिल्लक उसाची खरी कारणे आली समोर...
आपण उत्पादित केलेल्या वस्तू ह्या शुध्द आणि नैसर्गिक व सेंद्रिय आहेत, परंतु त्यांची विक्री वाढविण्यासाठी त्यांचे सदरीकरण सुंदर आणि ग्राहकांना आकर्षित करणारे असावे. यासाठी बाहेरील बाजार पेठांचा, उत्पादकांचा त्यांच्या उत्पादनाचा अभ्यास करण्याची गरज आहे. एकदा खरेदी केलेली वस्तू ग्राहकाने पुन्हा खरेदी करावी यासाठी ग्राहकांचे संपर्क क्रमांक नोंदवून घ्यावे, ग्राहकांना संपर्क करावा, त्यांना आपल्या उत्पादनाविषयीचा अभिप्राय विचारावा व त्यानुसार आपल्या उत्पादनात बदल आणि उत्पादनाचे प्रकार वाढवावेत असे सांगत राऊत यांनी बचतगटांना शुभेच्छा दिल्या.
महोत्सवाचे उद्घाटन कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते पार पडले तर “आंबा आणि तांदूळ महोत्सवाला” भरभरुन प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर महोत्सवाला भेट देऊन दर्जेदार व शुद्ध उत्पादने खरेदी करून ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाला हातभार लावण्याचे आवाहन अभियानाच्या उपसंचालक श्रीमती शीतल कदम यांनी केले आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांच्या शेतातील तांदुळाच्या विविध जाती, सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला हापूस, केशर, पायरी इत्यादी प्रकारचा आंबा या महोत्सवात उपलब्ध करण्यात आला आहे.
मोठी बातमी! एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा, साखर सहसंचालकांचे आदेश
या महोत्सवामध्ये इंद्रायणी हातसडीचा, इंद्रायणी पॉलिश, दप्तरी, जय श्रीराम, सेंद्रिय ब्लॅक, वाईसार, खुशबू, चिमण साळ, भवाळ्या जिरेसाल या प्रकारच्या जातींचा तांदूळ या महोत्सवामध्ये प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचसोबत अवळाची उत्पादने, विविधप्रकारचे पापड, विविध मसाले, रोस्टेड गहू, नाचणी चे खाद्य पदार्थ, बांबू पासून तयार केलेल्या कलाकृती यासारख्या अनेक गोष्टी या महोत्सवात प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या;
आता एलआयसीने फसवले! पाच मोठ्या कंपन्यांमधूनही पडली बाहेर, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले
..तेव्हाच पेरणी करा, कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले आवाहन
आताची सर्वात मोठी बातमी! पेट्रोल- डिझेल होणार स्वस्त, मोदी सरकारने थेट तारीखच सांगितली..
Published on: 21 May 2022, 02:51 IST