Success Stories

शेती करण्यासाठी सर्वात महत्वाचे पाणी हे लागतेच. पाणी साठवण्यासाठी शेतकरी शेततळे बांधतात. असे असताना राज्यात एका शेततळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हे शेततळे सर्वात मोठे असल्याचे सांगितले जात आहे.

Updated on 29 November, 2022 11:53 AM IST

शेती करण्यासाठी सर्वात महत्वाचे पाणी हे लागतेच. पाणी साठवण्यासाठी शेतकरी शेततळे बांधतात. असे असताना राज्यात एका शेततळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हे शेततळे सर्वात मोठे असल्याचे सांगितले जात आहे.

जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव येथील शेतकरी लक्ष्मण सुरडकर यांनी हे शेततळे बांधले आहे. त्यांनी अडीच एकरात 1 हजार 50 वर्गफूट गोलाकार शेततळे साकारले आहे. दोन वर्षांपासून याचे काम सुरू होते.

हे शेततळे बांधण्यासाठी त्यांना 22 लाख रुपये लागले आहेत. त्यांना याचा 21 एकर साठी त्यांना फायदा होणार आहे. पाणीटंचाईला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवत होती.

चालू बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापावी, महावितरणच्या संचालकाचे आदेश

सुमारे 30 हजार लोकांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठी सद्या या शेततळ्यात आहे. तसेच शेतीला देखील आता पाणी मिळणार आहे. एवढा मोठा शेततळे तयार करण्यासाठी त्यांना दोन वर्षे लागले. मात्र आता भविष्याची चिंता मिटली आहे.

कडकनाथ घोटाळ्याबाबत मोठी बातमी! कंपनीच्या संचालकाला अटक, शेतकऱ्यांचे बुडालेले पैसे मिळणार का?

दरम्यान, तब्बल 1050 वर्गफूट वर्तुळाकाराचा हा शेततळे आहे. 15 ते 20 कामगारांना तळ्याच्या बुडात मेणकापड अंथरण्यासाठी अडीच दिवस लागले. यामुळे हे किती मोठे भव्य दिव्य असेल याचा अंदाज तुम्हाला येईल.

महत्वाच्या बातम्या;
काट्यांबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, शेतकऱ्यांची काटामारी थांबणार का?
कर्जमाफी मिळूनही शेतकऱ्यांना दिली नोटीस, एसबीआय बँकेला बजावला दंड
चीनमध्ये लोकांचा लॉकडाऊनला विरोध, सरकारविरोधातील आंदोलनात 10 लोकांचा मृत्यू

English Summary: The largest farms in the state, 52 feet deep farms in Jalna..
Published on: 29 November 2022, 11:53 IST