देशातील नवयुवक अलीकडे नोकरी पेक्षा व्यवसायात अधिक रुची दाखवत आहेत. विशेषता देशातील नवयुवकांना आता शेती क्षेत्राचे मोठे येड लागले आहे. आता देशातील सुशिक्षित नवयुवक शेती क्षेत्राकडे वळत असून यामध्ये चांगले यश देखील संपादन करत आहेत. असं सांगितलं जातं की, नोकरी आणि व्यवसाय यातील फरक ज्याला कळतो त्यालाच संघर्ष आणि यश यातील फरक चांगला कळतो.
संबंधित बातम्या:
राजू शेट्टीचा हुंकार!! भोंगे उतरवण्याचे राहुद्या आधी शेतकऱ्याची झाडाला लटकलेली बॉडी उतरवा
रांची येथील एमबीए प्रोफेशनल असलेल्या निशांतने नोकरी सोडण्याचा जो मार्ग निवडला, तोच मार्ग आज त्याला यशाच्या नव्या उंचीवर घेऊन जात आहे. रांचीमधील रातू येथे राहणारा निशांत कुमार आणि त्याच्या दोन पार्टनर यांनी मत्स्य पालन व्यवसायात चांगले नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
विशेष म्हणजे निशांत यांनी जवळपास 10 वर्षे एका नामांकित खासगी कंपनीत काम केले आहे. मात्र दहा वर्षे काम करून देखील नोकरीमध्ये समाधान मिळत नसल्याने अखेर निशांतने नोकरी सोडली आणि 2018 मध्ये मासेमारीला सुरुवात केली. आणि आज तो बायोफ्लॉक, पेन कल्चर, जलाशय आणि तलाव संवर्धनातून मोठ्या स्तरावर मत्स्यपालन व्यवसाय करत असून यातून लाखो रुपयांची कमाई करत आहे. निश्चितच निशांत त्यांचे हे यश इतरांना प्रेरणा देणार आहे.
इंडोनेशियामधून मत्स्यपालनाचे तंत्र शिकलेला निशांत सध्या 74 बायो-फ्लॉक्स आणि इतर पद्धती वापरून एका दिवसात सुमारे 300 किलो मासे बाजारात पाठवत आहे. नफ्याबद्दल बोलायचे झाले तर, एका दिवसात सुमारे 36 हजारांची विक्री होते.
त्यामुळे एका महिन्यात सुमारे 11 लाख रुपयांचे उत्पन्न त्याला मिळत आहे. निशांत सांगतो की, त्याने अनेक प्रकारे मासे वाढवले आहेत. मत्स्यपालनासाठी तलाव असणे आवश्यक नाही, तर कृत्रिम तलाव आणि जलाशयात ही मासे वाढवता येतात, असे त्यांनी सांगितले.
बायोफ्लॉक ही एक कृत्रिम टाकी असते, ज्यामध्ये 15 हजार लिटर पाणी असते आणि एवढ्या क्षमता असलेल्या टाकीमध्ये सुमारे 300 किलो मासे पाळले जातात. पंगास, मोनोसेक्स तेलापिया, व्हिएतनामी कोई, रोहू, कातला, मृगल कार्प, सिल्व्हर ग्रास कार्प, देसी मांगूर आणि गोल्डन कार्प यासह इतर मासे आहेत. या एका टाकीवर मासळी वाढवण्यासाठी महिन्याला केवळ 1500 रुपये खर्च येतो.
हे मासे तयार होण्यासाठी सुमारे 3 महिने लागतात. आणि जेव्हा मासे 200 ते 300 ग्रॅम होतात. मग बाजारात त्यांची मागणी त्यांच्या वजनानुसार ठरवली जाते. येथे मिळणारे ताजे मासेही खरेदीदारांना आवडतात. जिथे मत्स्यपालन केंद्रात 7 जणांना थेट रोजगार मिळाला आहे.
त्याच वेळी 40 लोक अप्रत्यक्षपणे त्याच्याशी संबंधित आहेत. यामध्ये स्थानिक लोकांसोबत बिहार आणि ओडिशामधील लोकांचाही सहभाग आहे. निशांतला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 40% अनुदान मिळाले आहे. निशांत अनेक प्रकारे मत्स्यपालन करत आहे, जे इतर राज्यातील लोकांनाही विशेष पसंत येतं आहे.
गुजरातचे विशाल निशांतच्या मासेमारीच्या शैलीबद्दल खूप उत्सुक आहेत. त्यांनाही येथून शिकून गुजरातमध्ये स्वत:चा रोजगार निर्माण करायचा आहे. निश्चितच गुजराच्या विशाल प्रमाणे निशांत यांच्या कामाचे अनेक लोक आता चाहते बनत आहेत.
Published on: 02 May 2022, 12:42 IST