Success Stories

आपल्या भारतीय परंपरेमध्ये गाय ही अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते.आपल्याकडे लोक गायीची पूजा करतात आणि देवाच्या बरोबरीने सन्मान आपल्या भारतीय परंपरा गाईला दिला जातो.

Updated on 27 June, 2022 11:03 AM IST

आपल्या भारतीय परंपरेमध्ये गाय ही अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते.आपल्याकडे लोक गायीची पूजा करतात आणि देवाच्या बरोबरीने सन्मान आपल्या भारतीय परंपरा गाईला दिला जातो.

आपल्याला माहित आहेच कि गाईच्या दुधापासून दही,लोणी, चीज आणि तूप इत्यादी आणि पदार्थ बनवले जातात आणि आपण त्या आपल्या जीवनात बऱ्याच प्रमाणात वापरतो.

त्यासोबतच गाईच्या शेणाचा इंधन म्हणून देखील वापर केला जातो. परंतु या सगळ्यांपेक्षा हटके अशा एका गोष्टीबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

याच्या वर सहसा कोणी विश्वास ठेवणार नाही परंतु ते सत्य आहे. कारण शेणापासून बनवलेले दागिने असतात हे ऐकल्यावरच अगोदर विश्वास बसण्यास कठीण होते. याबद्दल या लेखात सविस्तर माहिती घेऊ.

नक्की वाचा:दुग्ध व्यवसायात फायद्याच्या आहेत 'या' 50 लिटर दूध देणाऱ्या देशी गाई, वाचा सविस्तर माहिती

गायीच्या शेणापासून बनवलेले दागिने महिलांच्या  आर्थिक उन्नतीस कारणीभूत

मुळच्या बिहारमधील समस्तीपुर जिल्ह्यातील प्रेम लता या महिलेने गायीची उपयुक्तता प्रेरणादायी मानून लोकांना संदेश देण्याचे काम केले आहे.

गाईच्या दुधापासून दुग्धजन्य पदार्थांपासून शेणापर्यंतची उपयुक्तता सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. प्रेमलता वेगवेगळ्या राज्यात आणि लहान मोठ्या गावांमध्ये,

शहरांमध्ये जाऊन तेथील महिलांना आणि बेरोजगारांना जवळपास तीस वर्षापासून शेणाची उपयुक्तता सांगताहेत. विशेष म्हणजे प्रेमलता ह्या गाईच्या शेणाचा वापर करून दागिने बनवून लोकांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित करत आहेत.

नक्की वाचा:'या' ठिकाणची एक गोवरी चक्क विदेशात विकली जात आहे 10 रुपयाला, तुम्हीही सुरु करू शकतात 'हा' हटके व्यवसाय

 प्रेमलता यांनी शेणापासून बनवलेले 2000 अधिक प्रॉडक्ट

 प्रेमलता यांनी आतापर्यंत शेनापासून  दोन हजार पेक्षा जास्त उत्पादने तयार केली असून जी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सेंद्रिय आणि आरोग्यदायी आहेत.

यामध्ये दागिने पासून ते घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू,पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, अगरबत्त्या, घर सजवण्यासाठी मूर्ती, शेणाच्या विटा, चप्पल, घड्याळे, खेळणी, कानातले, हार, बांगड्या तसेच केसांच्या क्लिप आणि अनेक वस्तू त्यांनी बनवले आहेत.

प्रेम लता यांची दागिने बनवण्याची कला अतिशय अप्रतिम असून यातून केवळ स्वतःला स्वावलंबी बनवले नाही तर बिहारच्या विविध भागात जाऊन बिहारमधील महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित केले आहे.

नक्की वाचा:पंजाबच्या गाई जास्त दूध देतात आणि आपल्या का कमी देतात, शेतकऱ्यांनो वाचा कारणे

English Summary: making ornaments from cow dung give financial support to women
Published on: 27 June 2022, 11:03 IST