शेती आणि शेतीची पद्धत यामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. शेतीमध्ये असे असे भन्नाट प्रयोग केले जात आहेत ही अशा प्रयोगांचा कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल.
आपण आता पाहतो आहे की शेती फक्त मातीतच करता येत नाही तर शेती करण्याच्या पद्धतीत सुद्धा बदल मत्स्यपालनाचा झालेला आहे.हायड्रोपोनिक्स, एक्वा पोनिक्स, एरोपोनिक्स असे भरपूर प्रकार शेती करण्याच्या मध्ये आले आहेत. शेती संबंधित जोडधंदा मध्ये सुद्धाअशाचप्रकारची प्रगती होत आहे.आता यामध्ये मत्स्यपालनाचा विचार केला तर मासे पाळण्यासाठी आता मोठ्या प्रकारच्या तलावांची किंवा बंधाऱ्याची गरज नसून अगदी बायॉफ्लोक या तंत्रज्ञानाने मत्स्यपालन यामध्ये बरीचप्रगती झाली आहे.
तसेच पीक लागवड पद्धती मध्ये सुद्धा आता बदल होत आहेत. सफरचंदाचा विचार केला तर सफरचंदहे फळपीक उत्तर भारतात म्हणजे थंड प्रदेशात येणारे पीक म्हणून याची ओळख आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी सफरचंदाचे प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी केले. त्याप्रमाणे खजूरचे देखील उदाहरण घेता येईल. परंतु या लेखामध्ये आपण एक अजब गाथा पाहणार आहोत.
आता आपल्याला कमळ म्हटले म्हणजे अगदी चिखलात, पाण्यात फुलणारे फुल म्हणून माहिती आहे. परंतु अगदी खडकाळ जमिनीवर कमळ फुलवणे म्हणजे अगदी विचाराच्या कक्षेबाहेरील गोष्टआहे. परंतु ही अशक्य वाटणारी गोष्ट बुलढाणा येथील साले मेहुणे या जोडीने शक्य करून दाखवले आहे. याबद्दल या लेखात माहितीघेऊ.
चिखलात नव्हे तर खडकाळ जमिनीत फुलवली कमळ
बुलढाणा येथील कमलेश देशमुख आणि शेलगाव जहागिर या गावचे भागवत ठेंग हे दोन्ही व्यक्ती नात्याने साले मेव्हणे आहेत. या दोघांनी कमळाची बाग अशा खडकाळ जमिनीवर फुलवून दाखवले आहे.याबाबतचे सविस्तर माहिती अशी की,जेव्हा कोरोना मुळे लॉकडाऊन लागले तेव्हाकमलेश देशमुख यांची नोकरी गेली. त्यांच्याकडे शेती नव्हती
परंतु त्यांनी त्यांच्या साल्याला सोबत घेत त्याच्या दहा गुंठे खडकाळ जमिनीवरकमळ शेती करायला सुरुवात केली.या माध्यमातून त्यांनी लाखोरुपयांचे उत्पन्न तर मिळवले. वास्तविक पाहता कमलेश यांना आधीपासुनच झाडांची, विविध प्रकारच्या फुलांची आवड असल्यामुळे त्यांनी अगोदर त्यांच्या स्वतःच्याघराच्या गच्चीवर परसबाग तयार केली व त्यामध्ये कमळ शेती केली. परंतु हळूहळू व्यवसायाने गती पकडल्यानंतर कमलेश यांच्याकडे शेती नसल्याने त्यांनी त्यांच्या साल्याला विनंती करून त्याला सोबत घेत त्याच्या खडकात जमिनीमधील दहा गुंठे शेतीचे सपाटीकरण केले व तेथे कमळ शेती करायला सुरुवात केली.
आता कमळ शेतीचे ज्ञान त्याचे म्हटले म्हणजे ते हवे तेवढे त्यांना नव्हते परंतु त्यांनी यासाठी सोशल मीडियाचा अगदी बारकाईने व चपखलपणे वापर करून त्या माध्यमातून कमळ शेती बद्दल पूर्ण ज्ञान मिळवले. त्यांच्याकडे आता कमळाच्या भरपूर जाती असून या खडकाळ जमिनीवर कुठल्याही प्रकारचे पीक येत नव्हते त्या ठिकाणी आज त्यांनी कमळ शेती फुलवली आहे. या दहा गुंठे जागेवर ते विविध जातींच्या कमळाची रोपे तयार करतात व त्यांची विक्री ते सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून यशस्वीपणे करत आहेत. या माध्यमातून या दोघांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
ही जोडी संपूर्ण भारतामध्ये कमळाची आणि वॉटर लिली चीशेकडोप्रकारच्या जातींची रोपे तयार करतात व सोशल मीडियाच्या माध्यमातून विकतात व लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:व्हॉट्सअॅपवर दोन मिनिटांत मिळवा गृहकर्ज; एचडीएफसी बँकेची विशेष सुविधा
नक्की वाचा:13 शेतकऱ्यांची क्रांती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंजिर खाणार भाव, शेतकरी होणार लखपती…
Published on: 22 May 2022, 03:16 IST