Success Stories

आता मत्सपालन करून देखील चांगले पैसे आपण कमवू शकतो. उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला परिसरात एका शेतकऱ्यांने मत्सपालनातून (Fish farming) विक्रमी उत्पादन घेतले आहे. यामध्ये त्यांनी तलावाचा (lake) वापरचं केला नाही. तलावाचा वापर न करता बायो फ्लॉक पद्धतीने मत्स्यपालन केले आहे.

Updated on 20 May, 2022 10:33 AM IST

गेल्या काही वर्षात शेतीमध्ह्ये अनेक बदल झाले आहेत. अनेक शेतकरी आपली पारंपारिक शेती सोडून इतर शेतीजोड व्यवसाय करत आहेत. यामध्ये त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. असे असताना आता मत्सपालन करून देखील चांगले पैसे आपण कमवू शकतो. असेच काहीसे उत्तर प्रदेशमधील एका शेतकऱ्याने केले आहे. उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला परिसरात एका शेतकऱ्यांने मत्सपालनातून (Fish farming) विक्रमी उत्पादन घेतले आहे.

यामध्ये त्यांनी तलावाचा (lake) वापरचं केला नाही. तलावाचा वापर न करता बायो फ्लॉक पद्धतीने मत्स्यपालन केले आहे. यामुळे त्यांची चर्चा सुरु आहे. कमी खर्चात त्यांनी हे करून दाखवले आहे. यामध्ये मासे लवकर वाढतात आणि तयार होतात. त्यामुळे उत्पादनातही (double benefit) वाढ होते. यामध्ये पाण्याचा कमी वापर करून मत्स्यपालन करता येते असेही त्याची सांगितले आहे.

या नवीन प्रयोगामुळे कृषी संस्था चालवणारे डॉ. दीपक मेहंदीरत्ता यांनी मत्स्यशेतीला एका नव्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे. यामध्ये बघितले तर जीरा विशिष्ट प्रकारचा पदार्थ सोडल्यानंतर ५ ते ६ महिन्यांत मासे तयार होऊन बाजारात विकले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अनेक पटींनी जास्त उत्पन्न मिळते. यामुळे जोडव्यवसायाचा हा एक चांगला मार्ग आहे.

तसेच Bio Flock तयार करण्यासाठी एकदाच गुंतवणूक करावी लागणार आहे. यानंतर पुढील 10 वर्षे तुम्हाला गुंतवणूक करावी लागणार नाही. यामध्ये बायोफ्लॉक तयार करणे, जिरे आणि मासे यांच्या आहारावर खर्च करावा लागतो, यामुळे हे एक फायदेशीर आहे. यामध्ये आपण वर्षातून दोनदा उत्पन्न घेऊ शकतो. एकदा मासे सोडले की 5-6 महिन्यांत तयार होतात. 2 क्यूबिक मीटरच्या बायो-फ्लोकमध्ये एका वेळी 500 पर्यंत मासे तयार केले जातात.

2 क्यूबिक मीटरचे बायो क्लॉक तयार करण्यासाठी एकूण 10 हजार रुपये खर्च येतो. त्यानंतर १० वर्ष याचा खर्च येत नाही. तसेच या माशांचे वजन 1 ते दीड किलो पर्यंत असते. यामुळे जर योग्य व्यवस्थापन केले तर तुम्हाला यामधून चांगले पैसे मिळणार आहेत. बाजारात या माशांना २०० रुपयांपर्यंत दर मिळू शकतो. यामुळे ज्यांना मत्सपालन करायचे आहे, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

महत्वाच्या बातम्या;
नारळाची शेती देखील धोक्यात, 'या' पद्धतीने करा योग्य व्यवस्थापन
भगवंत मान सरकार शेतकऱ्यांसमोर झुकले, शेतकऱ्यांची मोठी मागणी केली मान्य...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, साखर उद्योग अभ्यासासाठी कृतिदल समितीची स्थापना

English Summary: Fish farming; It is very beneficial for farmers to fish without using the lake.
Published on: 20 May 2022, 10:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)