शेतकरी सध्या पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. यामधून शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहेत. आता पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील कृष्णा चावरे या शेतकऱ्याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खडकाळ जमिनीवर डाळिंब बाग फुलवून दाखवली आहे. यामुळे सध्या त्यांची चर्चा सुरु आहे.
त्यातून लाखोंचा उत्पन्न देखील त्यांनी मिळवले आहे. चावरे यांच्या डाळिंब बागेच्या एका कॅरेटला 3100 ते 2100 रुपयांचा भाव मिळाल्याने त्यांनी डाळिंब बागेसाठी केलेली मेहनत फळाला आली आहे. सध्या चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. चावरे यांची कोळीबोडखा शिवारात वडिलोपार्जित जमीन असून, त्यांनी सात एकर क्षेत्रावर डाळिंब बाग लावली आहे.
डाळिंब बागेतून पहिल्या वर्षी अडीच लाख खर्च तर पंचवीस लाखांचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे त्यांना लाखो रुपये मिळाले आहेत. त्यांच्या डाळींबाच्या फळाला देखील चांगला दर्जा आहे. पारंपारिक शेतीला फाटा देऊन काही तरी नवीन प्रयोग करण्याचं कृष्णा चावरे यांनी ठरवलं होते. त्यानुसार त्यांनी नियोजन केले होते.
आता ऊस आणि द्राक्षला ड्रॅगन फ्रूटचा पर्याय, ड्रॅगन फ्रूट फार्मिंग'ने आणली क्रांती..
त्यांचे स्वतःचे कृषी सेवा केंद्र देखील आहे. त्यांनी आपल्या सात एकर शेतात डाळीबांची बाग लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 2020 मध्ये शेतीविषयी नियोजन करून त्यांनी 2000 हजार झाडं लावली. तसेच योग्य खते आणि औषधे याच्या जोरावर त्यांनी हे करून दाखवले आहे.
'17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार'
नाशिकच्या बजारात चावरे यांचे डाळिंब विक्रीला जातो. दरम्यान, मराठवाड्यात मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी झाली. याचा डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचा याचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसाने डाळिंब बागावर मोठ्या प्रमाणात तेल्या, ठिपका, प्लेग, मर रोगाने आक्रमण केले. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या बागा देखील काढून टाकण्याची वेळ आली आहे.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! फॉस्फरस-पोटॅश खतांवर अनुदान मिळणार, सरकार शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते देणार
कमी क्षेत्रात लाखोंची कमाई, जळगावच्या शेतकऱ्याने शोधला शेतीतून दुहेरी उत्पन्नाचा मार्ग
रिपब्लिक ऑफ कोसोवोने नवी दिल्ली येथे पहिले व्यावसायिक वित्त कार्यालय उघडले
Published on: 04 November 2022, 01:10 IST