पुणे : भारत एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर आधारीत आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेती व्यवसायात (Farming) मोठी प्रगती करत आहेत. अनेक शेतकरी बांधव शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत चांगली नेत्रदीपक प्रगती साधत आहेत.
शेतीत नवीन तंत्रज्ञानाची जोड देत, वेगवेगळे प्रयोग (Agricultural Experiment) करीत शेतकरी बांधव आता शेतीतून लाखों रुपयांचे उत्पन्न कमवीत आहेत. पुण्यातील (Pune District) एका अवलिया शेतकऱ्याने देखील आधुनिकतेची कास धरली अन उन्हाळी हंगामात केळीची शेती करत लाखों रुपये उत्पन्न कमावण्याची किमयाही साधली आहे. विशेष म्हणजे या अवलियाने उत्पादित केलेली केळी चक्क मलेशिया मध्ये निर्यात करण्यात आली आहे. त्यांच्या केळीला मलेशिया आणि दुबई या देशात मोठी मागणी आहे.
महत्वाची बातमी:Watermelon Farming : टरबूज शेती करा आणि कमवा बक्कळ पैसा; वाचा याविषयी
पुण्यातील शिरूर तालुक्याच्या तांदळी गावाच्या आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या पाण्यावर आधारीत शेती आहे. या गावातील व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना भीमा व घोड नदीच्या पाण्याचा सहारा लाभला असून येथील शेतकरी बांधव ऊस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात.
परंतु तांदळीच्या माळवाडी येथील रहिवाशी शेतकरी दत्तात्रय गदादे यांनी शेती मध्ये अभिनव प्रयोग करीत उन्हाळी हंगामात केळी लागवड करण्याचा अभिनव उपक्रम केला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने केलेला हा अनोखा प्रयोग यशस्वी झाला असून या अवलिया शेतकऱ्याने निर्यातक्षम केळी उत्पादित केल्या आहेत.
महत्वाची बातमी:Desi Jugad : पिकाच्या संरक्षणासाठी लातूरच्या शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड! राज्यात सर्वत्र याचीच चर्चा
दत्तात्रय गदादे या प्रगतिशील शेतकऱ्याने ऊस पिकाला फाटा देत चार एकर शेतजमिनीत केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने या नवयुवक शेतकऱ्याने जी9 या केळीच्या जातीची निवड केली.
यासाठी आवश्यक केळीची रोपे केळीच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातुन मागवली गेली. त्यांनी एकूण पाच हजार केळीची रोपे मागवली होती. केळीची शेती करण्यासाठी दत्तात्रय यांनी पूर्व मशागतिची योग्य काळजी घेतली. यासाठी सर्व प्रथम जमिनीची चांगली खोल नांगरणी केली आणि नंतर जमिनीला पाळ्या देऊन 15 ट्रॅक्टर चांगले कुजलेले शेणखत टाकण्यात आले. त्यानंतर सरी पाडून दोन टप्प्यात केळीची लागवड या शेतकऱ्याने केली.
महत्वाची बातमी:महत्वाची बातमी! मोदी सरकार शेतकऱ्यांना म्हातारपणात देणार पेन्शन; वाचा या योजनेविषयी
खत निर्मिती व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तागाची पेरणी करण्यात आली. संपूर्ण लागवड केल्यानंतर कमीत रासायनिक खतांचा वापर केला. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करत विद्राव्य खते सोडण्यात आली. दर पाच दिवसाला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले.
अळी नियंत्रणासाठी औषध फवारणी करण्यात आली. सहा महिन्यांतच केळीचे पिके दिसू लागले. केळीची लागवड केल्यानंतर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या सल्ल्याने योग्य ते पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन केल्यानंतर गदादे यांना तब्बल 11 महिन्यांनी केळीचे उत्पादन मिळाले.
त्यांना चार एकरात उन्हाळी हंगामात सुमारे 150 टन केळीचे उत्पादन मिळाले आहे. सध्या केळीला 14 रुपये किलो असा दर मिळतं आहे. निश्चितचं दत्तात्रय यांनी उन्हाळी हंगामात केळी पिकापासून मिळवलेले उत्पादन दर्जेदार असून इतर शेतकऱ्यांसाठी हे आदर्श ठरणार आहे.
महत्वाची बातमी:Organic Farming : पद्मश्री भारत भूषण यांनी सांगितला सेंद्रिय शेतीचा बेस्ट फॉर्मुला; उत्पन्न दुपटीने वाढणार
Published on: 04 May 2022, 01:21 IST