Others News

आजच्या युगात, प्रत्येकाला आपला व्यवसाय करायचा आहे परंतु बहुतेक लोकांना आपण कोणता व्यवसाय सुरू करू शकतो हे समजत नसल्या कारणाने गोंधळ उडतो. त्यामुळे आम्ही बऱ्याच लेखांच्या माध्यमातून काही व्यवसायांच्या कल्पना समोर आणत असतो.

Updated on 05 July, 2022 9:28 PM IST

 आजच्या युगात, प्रत्येकाला आपला व्यवसाय करायचा आहे परंतु बहुतेक लोकांना आपण कोणता व्यवसाय सुरू करू शकतो हे  समजत नसल्या कारणाने गोंधळ उडतो. त्यामुळे आम्ही बऱ्याच लेखांच्या माध्यमातून काही व्यवसायांच्या कल्पना समोर आणत असतो.

या लेखात देखील आपण आज अशाच काही कमी गुंतवणुकीतून चांगला नफा देणाऱ्या व्यवसायिक कल्पना अथवा व्यवसायांची माहिती घेणार आहोत.

 "कमी गुंतवणुकीत जास्त नफा" देणारे व्यवसाय

1- फिटनेस हेल्थ क्लब- आजच्या काळात लोक फिटनेस ला खूप गंभीरपणे घेत आहेत. कारण कोरोना काळापासून लोकांना आरोग्याबद्दल खूपच काळजी वाटू लागली असून लोक जागृत झाले आहेत.

बऱ्याचदा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो तर फारच कमी वयामध्ये अनेक लोकांना गंभीर आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे फिटनेस क्लब हा एक अतिशय भरभराटीचा व्यवसाय होऊ शकतो.

नक्की वाचा:शेतीपूरक व्यवसायातून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या नेमकं करायचं तरी काय..

2- कंप्यूटर आणि लॅपटॉप दुरुस्तीचा व्यवसाय- जर तुम्हाला संगणक दुरुस्त करता येत असेल तर तुमच्यासाठी ही आयडीया खूप सर्वोत्तम ठरू शकते. कारण बहुतांशी लोक आज संगणकाशिवाय जगू शकत नाही अशी स्थिती आहे  व संगणक ही काळाची गरज आहे.

आजकाल अनेक प्रकारच्या सरकारी आणि खाजगी संस्था संगणक आणि लॅपटॉप रिपेरिंग कोर्सेस चालवतात व हे कोर्सेस करायला खूप खर्च येत नाही त्यामुळे  असा कोर्स करून तुम्ही स्वतःचे लॅपटॉप रिपेरिंग सेंटर उघडून चांगला पैसा कमवू शकतात.

नक्की वाचा:बिझनेस आयडिया: कालांतराने दुप्पट कमाई देणारा व्यवसाय आता सुरु करा, जाणून घ्या माहिती

3- जनरल स्टोअर व्यवसाय- या दोन व्यवसायांनी व्यतिरिक्त तुम्ही दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे एक सामान्य स्टोअर उघडून  देखील व्यवसाय सुरू करू शकता. हा कमी खर्चात जास्त नफा देणारा व्यवसाय आहे.

या कॅटेगिरी तुम्ही किराणा माल, साबण, शाम्पू, ब्युटी प्रॉडक्ट, स्टेशनरी अशा अनेक प्रकारचे उत्पादने तुमच्या स्टोअर मध्ये ठेवू शकता व विक्री करू शकता.

फक्त 25 ते 40 हजारांच्या गुंतवणुकीतून तुम्ही हा व्यवसाय उभारू शकता.

4- काही स्वतंत्र व्यवसाय कल्पना- जर तुम्हाला चांगले लेखन, ग्राफिक डिझायनिंग, डेव्हलपमेंट किंवा एडिटिंग याबाबत काही माहीत असेल तर तुम्ही तुमच्या घरी बसून ट्रान्सलेशन करून चांगली कमाई करू शकता.

आजकाल बऱ्याच वेबसाईटचा आणि कंपन्यांना अशा लोकांची गरज आहे जे या सर्व गोष्टी करण्यात तज्ञ आहेत. या माध्यमातून फ्रीलान्सिंग तुम्ही करू शकतात त्यामुळे तुम्ही तो तुमचा व्यवसाय म्हणून सुरू करू शकता.

नक्की वाचा:कृषी व्यवसाय: सर्वात कमी गुंतवणुकीसह टॉप '6' कृषी व्यवसाय, देतील बक्कळ नफा

English Summary: you can start this business with less investment and earn more profit
Published on: 05 July 2022, 09:28 IST