उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. पती-पत्नीच्या प्रेमाचे चित्रण करणारा एक प्रसंग येथे घडला आहे. पत्नीला साप चावल्यामुळे पतीने तो साप पकडला. सापाला पकडून बाटलीत बंद केले. त्यानंतर पतीने पत्नी आणि सापाला रुग्णालयात नेले. महिलेला साप चावल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे महिलेवर उपचार सुरू आहेत.
ही घटना माखी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अफजल नगर परिसरात शुक्रवारी पहाटे घडली. महिलेसोबत साप पाहून डॉक्टरही चक्रावून गेले. त्यांनी महिलेचा पती रामेंद्र यादव यांना साप का आणला असा सवाल केला, यावर महिलेच्या पतीने सांगितले की, माझ्या पत्नीला कोणता साप चावला आहे, असे विचारले तर काय होईल. म्हणून मी साप सोबत आणला आहे, जेणेकरून तुम्ही स्वतः पाहू शकता. आणि उपचार करण्यास तुम्हाला मदत होईल. पत्नीच्या उपचारासाठी डॉक्टरांना माहिती मिळावी म्हणून पतीने साप सोबत नेल्याने चर्चेला उधाण आले.
पावसानेही सोडली शेतकऱ्यांची साथ; तब्बल 50 क्विंटल कांदा पावसाने आणला रस्त्यावर
पत्नीला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पतीने नंतर सापाला जंगलात सोडणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. एवढाच नाही तर सापाला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ नये यासाठी त्याने प्लास्टिकच्या बाटलीला छिद्र केल्याचेही सांगितले. अशाप्रकारे या तरुणाने पत्नी आणि साप दोघांचीही काळजी घेतली आणि पत्नीला उपचारासाठी घेऊन जात असताना सापाला श्वास घेता यावा यासाठी बाटलीला छिद्र देखील पाडले.
महत्वाच्या बातम्या:
पिकांच्या नुकसान क्षेत्राचे पंचनामे कार्यपद्धतीवरून कृषी विभाग आक्रमक; कार्यपद्धती निश्चित करण्याची मागणी
'आयराम कैची' २०० वर्षांपूर्वीचे फणसाचे झाड; तमिळ ग्रंथ आणि साहित्यातही आहे उल्लेख
Published on: 25 June 2022, 05:55 IST