निसर्गाचे सौंदर्य आपल्या सगळ्यांना नेहमीच आकर्षित करत असते. आपण अनेकदा हिल स्टेशनवर फिरायला जातो. आपल्याला डोंगरात सुंदर धबधबेही पाहायला मिळतात, पण निसर्गाचा असा एक चमत्कार जो तुम्हालाही चकित करून जाईल. तुम्ही कधी उलटा धबधबा पाहिला आहे का? हा एक रिव्हर्स वॉटरफॉल आहे. असा धबधबा जिथून पाणी खाली जात नाही तर डोंगरावर जाते.
हे ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु सोशल मीडियावरील हा व्हिडिओ चर्चेत आहे. ज्यामध्ये धबधबा खाली न वाहता उलट्या दिशेने वाहत आहे. लाखो वेळा पाहण्यात आलेला हा व्हिडिओ एका आयएफएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे. IFS अधिकाऱ्याच्या या व्हिडिओला 4 लाखांपर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत. हिरव्यागार डोंगरातून पाणी कसे वाहत आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.
IFS सुसंता नंदा यांनी या उलट्या धबधब्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. धबधबा उलटून वाहण्याचे कारणही त्यांनी दिले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, "हा धबधबा महाराष्ट्रातील नाणेघाट हिल स्टेशनमध्ये आहे. जेव्हा वाऱ्याच्या वेगाची तीव्रता गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्या समान आणि विरुद्ध असते. त्यानंतर पश्चिम घाटाच्या रांगेतील नाणेघाट येथे हा धबधबा उत्तम प्रकारे पडतो. हे पावसाळ्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे", असे त्यांनी म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकरी मित्रांनो; जनावरांना सर्पदंश झालाय? तर करा त्वरित 'हे' उपाय, अन्यथा...
'थोडा गृहपाठ करून मुख्यमंत्र्यांना भेटायला जायला हवे होते' पीककर्जावरून राजू शेट्टी यांनी लगावला टोला
Published on: 15 July 2022, 05:49 IST