water crisis in Kakadpana: “जल ही जीवन है” खरंतर पाण्याशिवाय जीवन याची कल्पनाही कुणी करू शकणार नाही. एकीकडे पाणी हेच जीवन आहे असं म्हटलं जातंय मात्र याच पाण्यासाठी कित्येकांना वणवण करावी लागत आहे. नाशिक शहरातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काकडपाना या भागातील महिलांना पाण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात घालावा लागत आहे.
पाण्यासाठी त्यांना जवळजवळ ७ किलोमीटर अंतरावर जावं लागत आहे. तिथे एक प्रचंड खोल दरी आहे. या दरीत महिला आपला जीव मुठीत धरून खाली उतरतात. दरीकडे जाणाऱ्या रस्त्याचीदेखील इतकी बिकट परिस्थिती आहे की सहज चालणं शक्य नाही. मात्र पाण्यासाठी त्यांना धोका पत्करावा लागत आहे. महिला डोक्यावर हंडा घेऊन ही दरी पार करत आहेत. दरी इतकी खडकाळ आहे की, एखाद्या महिलेचा पाय निसटला, तर जीवदेखील जाऊ शकतो.
एकप्रकारे या महिला दररोज पाण्यासाठी मृत्यूशी झुंज देत आहेत. पाण्यासाठी एवढ्या लांब येणे आणि जीव मुठीत धरून पाणी भरणे हा त्यांचा नित्यक्रम झाला आहे. या महिला आपलं दुःख सांगताना म्हणतात, "आमचं आयुष्य हे पाणी भरण्यातच चाललंय".
Breaking: भारताच्या गव्हात आढळला व्हायरस; 'या' देशाने परत केला भारतीय गहू
"दररोज हे जीवघेणं आयुष्य आम्हाला नको नको झालंय. पण करणार तरी काय? आम्हाला कोण पाणी देणार? विशेष म्हणजे एवढ्या लांब जाऊन देखील लगेच पाणी मिळत नाही. दगडाच्या कपारीतून थेंब थेंब पाणी पडतं, ते पाणी जसं साचल तसं एक एकाने ते भरायचं" या पाण्यासाठी महिलांना रात्री-बेरात्री इथं नंबर लावून बसावं लागतं. इथे राहणाऱ्या काही व्यक्तीने आपल्या व्यथा सांगितल्या , "आम्ही इथं कित्येक वेळा झोपलो आहे. याला नाईलाज आहे. कारण पाणी तर गरजेचं आहे ना?" अशी काकडपाना भागात पाण्यासाठी नागरिक वणवण करत आहेत.
भावनिक होऊन काही महिलांनी आपली परिस्थिती सांगितली. "आमच्याकडे बघायला कोणी तयार नाही." खरंतर हा प्रश्न या एकट्या गावाचा नसून पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांची अशीच कटू परिस्थिती आहे. आदिवासी ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांचे हक्क आणि सुविधा सरकारकडून कधी पुरवले जाणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी होणार ऐतिहासिक कांदा परिषद
पीक कर्जाबाबत जिल्हा प्रशासानाचा पुढाकार; 15 दिवसांमध्ये वाढणार पीककर्जाचा आकडा
Published on: 02 June 2022, 05:57 IST