अत्यंत चुरशीच्या होत असलेल्या विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान सुरू झाले असून सायंकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदानाची शेवटची मुदत चार वाजेपर्यंत असून राज्यसभेचा निकालानंतर आता विधान परिषदेचा निकाल काय येतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत दगाफटका नंतर महा विकास आघडी आता सावध झाली असून भाजपने देखील या निवडणुकीत देखील राज्यसभेच्या निवडणुकीत सारखा चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
भाजपची या निवडणुकीत स्थिती
भाजपकडे चार उमेदवार निवडून येतील एवढे मत आहेत. परंतु पाचव्या जागेसाठी भाजपकडे एकही मत शिल्लक नसताना भाजपा चमत्कार कोणत्या पद्धतीने घडवून आणणार? हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपची खरी लढत काँग्रेससोबत असून काँग्रेसचे भाई जगताप यांच्या विरुद्ध भाजपने प्रसाद लाड यांनी उमेदवारी दिली आहे. भाजपच्या या पाचव्या उमेदवाराचे सगळे गणित छोटे पक्ष आणि अपक्ष यांच्यावर अवलंबून असून यापेक्षा आणि छोट्या पक्षांचे एकोणतीस आमदार आहेत.
. या सगळ्यांनी जर भाजपला मतदान केले तर ही निवडणूक भाजप साठी सोपी होणार आहे. विधान परिषदेची खरी लढत दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्या मध्ये आहे.
त्यामुळे एकंदरीत विचार केला तर विधानपरिषदेची ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्याचे दिसून येत आहे.
नक्की वाचा:मनसे पदाधिकार्यांचे अनोखे आंदोलन; शेणखताची बॅग देऊन...
महाविकास आघाडीकडे 170 संख्याबळ
महा विकास आघाडीकडे 170 आमदारांचे संख्याबळ असून प्रत्येक उमेदवारास 28 मतांचा कोटा निश्चित करण्यात आल्याचे समजते.
आघाडीच्या संयुक्त प्लॅनिंग विचार करण्यासाठी रात्री निवडक नेत्यांची ट्रायडंट हॉटेल मध्ये बैठक झाली. याबैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
आमदारांची एकूण संख्या आणि मतांचा कोटा समजून घेऊ
एकूण जागा दहा - अकरा उमेदवार रिंगणात
इतर मते 29 आहेत - त्या 29 पैकी अपक्ष आमदार तेरा आणि छोटे पक्ष 16
अपात्र मते-3= एकाचे निधन तर दोन आमदार तुरुंगात
शिवसेना 55 मते- सात अपक्षांचा पाठिंबा- दोन जागा- शिवसेनेकडे कोट्यापेक्षा 10 मते जास्त
राष्ट्रवादी 51 मते- राष्ट्रवादीने दोन जागा, तीन मतांची निवडून येण्यासाठी गरज
काँग्रेस 44 मते-दोन जागा, निवडून येण्यासाठी आठ मतांची गरज
भाजप 106 मते- पाच जागा,निवडून येण्यासाठी 29 मतांची गरज
नक्की वाचा:मोठी बातमी! दुधाच्या प्लास्टिक पिशवीवर बंदी, अमूल ग्रुपने घेतला मोठा निर्णय..
Published on: 20 June 2022, 10:29 IST