Voter ID Card: भारतात मतदान कार्ड (Voter Id) हे एक महत्वाचे आणि मतदानाचा (Voting) अधिकार देणारे कार्ड आहे. मुख्यता मतदान कार्ड हे मत देण्यासाठीच वापरले जात असले तरी देखील याचा अनेक सरकारी कामात (Government Scheme) एक महत्त्वाचे कागदपत्र (Important Document) म्हणून देखील वापर केला जातो. मतदान हे देखील एक महत्त्वाचे दानचं आहे. यामुळे भारतातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांकडे मतदान कार्ड असणे अनिवार्य नाही मात्र जबाबदारीचे आहे. मात्र असे असले तरी अनेकदा मतदान कार्ड बनवताना भारतीय नागरिकांना (Indian Citizens) नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो.
यामध्ये प्रामुख्याने वारंवार मतदान कार्ड बनवण्यासाठी सीएससी सेंटर ला वाऱ्या घालाव्या लागतात. अनेकदा नागरिकांकडे अपूर्ण कागदपत्रे असल्यामुळे मतदान कार्ड बनवण्यासाठी अडचण निर्माण होते. मात्र आज आम्ही आपल्या वाचक मित्रांसाठी ऑनलाइन पद्धतीने मतदान कार्ड साठी कसा अर्ज केला जाऊ शकतो तसेच या साठी कोण कोणते कागदपत्रे अनिवार्य राहणार आहेत याविषयी सविस्तर माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया वोटर आयडी कार्ड अर्थात मतदान कार्ड बनवण्याची ऑनलाइन पद्धत कशी आहे.
ऑनलाइन मतदान कार्डसाठी अर्ज कसा करावा बरं?
नवीन वोटर आयडी कार्ड किंवा मतदान कार्ड बनवणे तुलनेने खूपचं सोपे आहे. मतदान कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे यासाठी आवश्यक संपूर्ण कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. तुमच्याकडे सर्व कागदपत्रे उपलब्ध झाल्यास तुम्हाला सर्वप्रथम भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. या वेबसाईटवर गेल्यानंतर, तुम्ही मतदान कार्ड नोंदणी पूर्ण करू शकता. या संकेतस्थळावर निवडणूक प्रक्रियेची सर्व माहिती निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये अनेक फॉर्म देखील समाविष्ट आहेत जे तुम्ही ऑनलाइन डाउनलोड करू शकता.
मित्रांनो आपणास सांगू इच्छितो की, येथून तुम्ही तुमच्या सोयीनुसार फॉर्म डाउनलोड करू शकता. तुम्हाला जुन्या मतदान कार्डमध्ये काही बदल करायचे असल्यास, तुम्ही ते येथूनही करू शकता. सुरक्षा कर्मचारी आणि देशाबाहेर राहणाऱ्या लोकांसाठी वेगळा फॉर्म आहे. नवीन मतदार अर्जासाठी, तुम्हाला फॉर्म 6 निवडावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर तुम्ही ऑनलाइन देखील सबमिट करू शकता.
ऑनलाइन अर्ज कसा करावा बरं
मित्रांनो ऑनलाइन मतदान कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. वेब साईटवर गेल्यानंतर (National Voters Services Portal) राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर क्लिक करा. यानंतर "नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करा" (Apply online for registration of new voter) वर क्लिक करा. फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती व्यवस्थितरित्या प्रविष्ट करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. शेवटी 'सबमिट' या बटनवर क्लिक करा.
सर्व तपशील एंटर केल्यानंतर तुमच्या ई-मेलवर एक मेल येईल. नोंदणीकृत ईमेलवर एक लिंक देखील येईल. यानंतर तुम्ही मतदार ओळखपत्र अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकाल. जर सर्व काही ठीक झाले तर तुम्हाला जास्तीत जास्त एका महिन्यात मतदार ओळखपत्र मिळेल.अनेक प्रकरणांमध्ये, मतदार ओळखपत्र एक आठवडा ते 10 दिवसांत पोहोचते.
Published on: 02 August 2022, 03:31 IST