Others News

बाजारामध्ये विविध कंपन्यांचे स्मार्टफोन मिळतात.परंतु कमीत कमी किमतीत चांगल्या दर्जाचा स्मार्टफोन मिळणे ही सगळ्यांची इच्छा असते. उत्तम दर्जाच्या स्मार्टफोनच्या बाबतीत विवोने देखील स्वतःची छाप ग्राहकांमध्ये उमटवली आहे.या लेखामध्ये आपण विवो कंपनीचा अगदी कमीत कमी किमतीचा लो बजेट स्मार्टफोन विषयी माहिती घेणार आहोत.

Updated on 18 July, 2022 2:43 PM IST

बाजारामध्ये विविध कंपन्यांचे स्मार्टफोन मिळतात.परंतु कमीत कमी किमतीत चांगल्या दर्जाचा स्मार्टफोन मिळणे ही सगळ्यांची इच्छा असते. उत्तम दर्जाच्या स्मार्टफोनच्या बाबतीत विवोने देखील स्वतःची छाप ग्राहकांमध्ये उमटवली आहे.या लेखामध्ये आपण विवो कंपनीचा अगदी कमीत कमी किमतीचा लो बजेट स्मार्टफोन विषयी माहिती घेणार आहोत.

 विवोचा लो बजेट Y15s स्मार्टफोन

 विवोने हा स्मार्टफोन  काही महिन्यांपूर्वी लॉंच केला असून ग्राहकांसाठी यामध्ये अतिशय चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत. विवो चा या मोबाईल मध्ये ग्राहकांना वॉटर ड्रॉप स्टाईल नॉच डिस्प्ले, डुएल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

हा मोबाईल गूगल अँड्रॉईड गो एडिशन या प्रणालीवर चालतो.  तसेच ग्राहकांसाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

नक्की वाचा:Smartphone: खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये आहेत हे उत्तम स्मार्टफोन,आहेत वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण

 या स्मार्टफोनची किंमत

 या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 3जीबी राम 32जीबी स्टोरेज मिळते. या फोनची किंमत कंपनीने दहा हजार 990 रुपये ठेवले आहे. तसेच हा स्मार्टफोन दोन रंगांमध्ये येतो एक म्हणजे मिस्टिक ब्लू आणि दुसरा म्हणजे वेव्ह ग्रीन असे दोन पर्याय देण्यात आले आहेत.

 या स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन्स

1- हा मोबाईल ड्युअल नॅनो सिम सपोर्ट करत असून अँड्रॉइड अकराच्या फनटच OS11.1या प्रणालीवर काम करतो. या फोनमध्ये 6.51 इंच एचडी प्लस(720×1600 पिक्सल) चे आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे.

यात ऑक्ट कोर मीडियाटेक हिलिओ P35 प्रोसेसरसह तीन जीबी रॅम देण्यात आली आहे.या फोनमध्ये बत्तीस जीबी स्टोरेज देण्यात आला असून ग्राहक एसडी कार्ड देखील टाकू शकतात.

नक्की वाचा:Bussiness Idea: तुमच्या गावात उघडा 'कॉमन सर्विस सेंटर' आणि कमवा बक्कळ नफा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

2-फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

यामध्ये तेरा मेगापिक्सलचा प्राथमिक लेन्स देण्यात आली आहे.दुसरा कॅमेरा हा 2 मेगापिक्सेलचा आहे.सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

3- कनेक्टिविटी साठी फोन मध्ये 4G LTE,डुएल बँड वाय फाय, ब्लूटूथ  v5.0,GPS/A-GPS, एफ एम रेडिओ, मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आले आहे. एवढेच नाही तर या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना साइड फिंगरप्रिंट देखील मिळाले आहे.

नक्की वाचा:Mobile World: नवीकोरी कंपनीचा नवाकोरा 'नथिंग फोन' चे बाजारात पदार्पण,वाचा त्याची वैशिष्ट्ये

English Summary: vivo y15s smartphone is get so chepest rate and give more feature
Published on: 18 July 2022, 02:43 IST