Others News

Vasubaras Diwali 2022 : भारतीय संस्कृतीत दिवाळी (Diwali 2022) सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीला मान आहे. वसुबारस (Vasu Baras 2022) म्हणजेच गाय आणि वासरू. या दिवशी गाय-वासराची पूजा (Vasu Baras Poojan Vidhi) करत दिवाळी पर्वाला सुरुवात होते. आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे.

Updated on 21 October, 2022 8:15 AM IST

Vasubaras Diwali 2022 : भारतीय संस्कृतीत दिवाळी (Diwali 2022) सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीला मान आहे. वसुबारस (Vasu Baras 2022) म्हणजेच गाय आणि वासरू. या दिवशी गाय-वासराची पूजा (Vasu Baras Poojan Vidhi) करत दिवाळी पर्वाला सुरुवात होते. आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे.

अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. वसुबारसपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते. या वसुबरारसेचं नेमकं महत्त्व काय? याविषयीची माहिती जाणून घेऊ..

दिवाळीचा पहिला दिवस हा गाई वासरांची दिवाळी म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे. तिच्‍याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस (Vasubaras) या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते.

हेही वाचा: IFFCO MC कडून मका पिकासाठी सर्वोत्तम तणनाशक 'युटोरी' ची निर्मिती

भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे. गायीच्याप्रती कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरु यांची पूजा केली जाते. आश्‍विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात.

हेही वाचा: कोल्हापूरमध्ये भारतातील सर्वात मोठे अंडे! कोंबडीने घातले 210 ग्रॅम वजनाचे अंडे..

समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.

हेही वाचा: सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही- कृषीमंत्र्यांची माहिती

English Summary: Vasubaras Diwali 2022 : First Day of Diwali Vasubaras
Published on: 21 October 2022, 08:15 IST