Others News

आधार कार्ड आणि कुठल्याही प्रकारचे शासकीय काम असो किंवा योजनांचा फायदा हे एकमेकांशी निगडित गोष्टी आहेत. आपल्यापैकी बर्याच जणांना हा अनुभव आला असेल की, आधारकार्ड वर कुठल्याही प्रकारची थोडीशी जरी चुकी राहिली तर खूप प्रकारचा मानसिक त्रास सहन करावा लागतो व बऱ्याचदा होणारे काम हातातून जाते. एवढेच नाही तर परत ती चूक दुरुस्त करण्यासाठी जो काही वेळ आणि खर्च होतो तो वेगळाच.

Updated on 07 September, 2022 10:59 AM IST

 आधार कार्ड आणि कुठल्याही प्रकारचे शासकीय काम असो किंवा योजनांचा फायदा हे एकमेकांशी निगडित गोष्टी आहेत. आपल्यापैकी बर्‍याच जणांना हा अनुभव आला असेल की, आधारकार्ड वर कुठल्याही प्रकारची थोडीशी जरी चुकी राहिली तर खूप प्रकारचा मानसिक त्रास सहन करावा लागतो व बऱ्याचदा होणारे काम हातातून जाते. एवढेच नाही तर परत ती चूक दुरुस्त करण्यासाठी जो काही वेळ आणि खर्च होतो तो वेगळाच. 

आता आपल्याला माहित आहेच कि, आधार कार्ड वरील जन्मतारखेतील चूक किंवा नावातील बदल, मोबाईल नंबर बदल होणे इत्यादी बर्‍याच प्रकारच्या समस्या उद्भवतात.

नक्की वाचा:Aadhar Card आणि Pan Card मध्ये स्पेलिंग मिस्टेक झालीय का? मग काळजी नको असे करा दुरुस्त

परंतु यामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे बऱ्याचदा आपण आपला राहता पत्ता बदलतो त्यामुळे देखील मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

परंतु यासाठी आता कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नसून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी घरबसल्या तुमचा पत्ता ऑनलाइन अपडेट करु शकतात व त्यासाठी लागणारा खर्च सुद्धा जास्त नसून तुम्हाला अवघ्या पन्नास रुपयांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करता येते.

 घरबसल्या करा तुमचा पत्ता अपडेट

1- सगळ्यात अगोदर तुम्हाला यासाठी युआयडीएआयच्या myaadhaar.uidai.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

2- या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला अगोदर लॉग इन करावे लागेल. यासाठी तुम्हाला तुमचा जो काही आधार क्रमांक आहे तो येथे टाकावा लागेल.

हा क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक कॅपचा कोड टाकून 'सेंड ओटीपी' वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या नंबर वर एक ओटीपी येईल व हा ओटीपी या ठिकाणी नमूद करा व लॉगिन करा.

नक्की वाचा:एकाच दिवशी वाढलेल्या संपत्तीमुळे अदानी वरच्या क्रमांकावर गेले, आकडा वाचून डोळे होतील पांढरे

3- तुमच्या लॉगिन पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी 'आधार अपडेट' या पर्यायावर जा व त्यानंतर 'प्रोसीड टू आधार अपडेट' या पर्यायावर क्लिक करा.

4- या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पुढील पानावर पत्ता निवडा आणि 'प्रोसीड टू आधार अपडेट' या पर्यायावर क्लिक करा.ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तो पत्ता तुमच्यासमोर येईल.

5- यानंतर तुम्हाला कुठला पत्ता अपडेट करायचा आहे तो पर्याय येतो व या ठिकाणी तुम्ही राहत असलेल्या नवीन पत्त्याचे संपूर्ण माहिती भरावी. यानंतर तुम्हाला एक डॉक्यूमेंट सबमीट करावी लागेल यावर तुमचा नवीन पत्ता असेल.

नक्की वाचा:भारीच की! iPhone 12 वर मिळत आहे 25 हजार रुपयांहून बंपर सूट; पहा ऑफर...

6- इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला खाली असलेल्या दोन्ही चेक बॉक्स वर क्लिक करावे लागेल आणि नेक्सट वर क्लिक करावे लागेल.

7- नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट म्हणून एक पर्याय दिसेल. या ठिकाणी तुम्ही तुम्हाला सोयीस्कर युपीआय नेट बँकिंग किंवा कार्डच्या माध्यमातून पेमेंट करू शकतात.

8- तुमचा पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल व यानंतर अवघ्या दोन दिवसात तुमचा पत्ता अपडेट होईल.

नक्की वाचा:Crop Protection: ट्रायकोकार्ड म्हणजे काय? कसा करावा वापर काय होतो फायदा?

English Summary: use this secure and easy method for change your adress on adhaar card by online
Published on: 07 September 2022, 10:59 IST