Others News

आधार कार्ड हे नागरिकांसाठी किती आवश्यक कागदपत्र आहे हे नवीन सांगायची गरज नाही. या पार्श्वभूमीवर आधार कार्ड बनवणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने या बाबतीत एक अपडेट जारी केले असून यामध्ये आता आधारशी संबंधित होणारी फसवणूक थांबवण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. त्यातच महत्त्वाचे म्हणजे युआयडीएआय आता जन्म आणि मृत्यूचा डेटा देखील आधारशी लिंक करणार आहे.

Updated on 28 September, 2022 3:57 PM IST

आधार कार्ड हे नागरिकांसाठी किती आवश्यक कागदपत्र आहे हे नवीन सांगायची गरज नाही. या पार्श्वभूमीवर आधार कार्ड बनवणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने या बाबतीत एक अपडेट जारी केले असून यामध्ये आता आधारशी संबंधित होणारी फसवणूक थांबवण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. त्यातच महत्त्वाचे म्हणजे युआयडीएआय आता जन्म आणि मृत्यूचा डेटा देखील आधारशी लिंक करणार आहे.

नक्की वाचा:Aadhar Card : धक्कादायक! आधार कार्ड डुप्लिकेट पण असतं! तुमचं तर नाही ना, असं करा चेक, डिटेल्स वाचा

 नेमका काय आहे प्लॅन?

 आता नवजात बालकांना तात्पुरता आधार क्रमांक दिला जाईल व नंतर ते बायोमेट्रिक डेटासह अपग्रेड केले जाणार आहे. एवढेच नाही तर मृत्यू नोंदणीचे रेकॉर्ड देखील आधारशी जोडले जाणार आहे त्यामुळे आता आधार क्रमांकाचा गैरवापर देखील थांबण्यास मदत होणार आहे.

याबाबतीत युआयडीएआयच्या एका अधिकाऱ्याच्या मतानुसार,जन्मासोबत आधार क्रमांक वाटप केल्याने मुलाला आणि कुटुंबाला सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास सोपे होईल व सर्वांना सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळू शकणार आहे. परंतु त्यासोबतच मृत्यु डेटा  देखील आधार लिंक केल्याने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अर्थात डीबीटी योजनेचा होणारा गैरवापर टाळता येणार आहे.

नक्की वाचा:Ration Card Update : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी! आजच करा 'हे' काम, नाहीतर….

बऱ्याच ठिकाणी  लाभार्थीच्या मृत्युनंतर देखील त्याचा आधार क्रमांक वापरला जात आहे व यासाठी आता दोन पथदर्शी प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

जर आपण सध्याचा विचार केला तर पाच वर्षाच्या मुलांचा बायोमेट्रिक डेटा घेतला जातो. परंतु आता या प्रकल्पाच्या माध्यमातून संबंधित टीम मुलांच्या घरोघरी जाऊन त्यांचे बायोमेट्रिक तपशील घेऊन त्यांना कायमच आधार क्रमांक देऊ शकते.

मुलांचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक ते पुन्हा नोंदणी केली जाते. जर आपण पाच ते 18 वर्षे वयोगटातील लोकसंख्येचा विचार केला तर या पैकी 93 टक्के लोकांकडे आधार नोंदणी आहे तर पाच वर्षाखालील मुलांमध्ये ही संख्या केवळ 25 टक्क्यापेक्षा कमी आहे.

नक्की वाचा:Mobile Update: जबरदस्त वैशिष्ट्ये आणि परवडणाऱ्या किमतीत 'विवो'चा 'हा'आहे उत्तम स्मार्टफोन,वाचा माहिती

English Summary: uidai take some important steps towards misuse og aadhaar card
Published on: 28 September 2022, 03:57 IST