Others News

स्मार्टफोन सध्या काळाची गरज बनली असून कोणत्याही व्यक्तीकडे आता सध्या सहजपणे आता स्मार्टफोन दिसतात. कारण मोबाईल शिवाय कल्पनाच कोणी करू शकत नाही,असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.आपल्याला माहित आहेच कि स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या विविध प्रकारच्या कंपन्या आहेत.

Updated on 01 July, 2022 6:44 PM IST

स्मार्टफोन सध्या काळाची गरज बनली असून कोणत्याही व्यक्तीकडे आता सध्या सहजपणे आता स्मार्टफोन दिसतात. कारण मोबाईल शिवाय कल्पनाच कोणी करू शकत नाही,असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.आपल्याला माहित आहेच कि स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या विविध प्रकारच्या कंपन्या आहेत.

अगदी 7 हजार रुपयापासून ते लाख रुपयांपर्यंतचे स्मार्टफोन मिळतात. यातच तरूणाईचा विचार केला तर तरुणाईचा ओढा हा जास्तीत जास्त करून अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी युक्त आणि महागडे स्मार्टफोन वापरण्याकडे असतो.

त्यामुळे तरुणाई जास्तकरून वन प्लस आणि एप्पल सारखे स्मार्टफोन ला पसंती देतात. अशा स्मार्टफोन शौकीन असलेल्या तरुणाईसाठी आनंदाची बातमी आहे,म्हणजे वनप्लस या अँड्रॉइड स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपनीने OnePlus Nord 2T हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला

असून यामध्ये जबरदस्त क्षमता असलेल्या बॅटरी सोबतच अनेक प्रकारचे वेगवेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण फिचर्स देण्यात आली आहे.

नक्की वाचा:Small Business Idea: कमी बजेट मध्ये सुरु करा हे व्यवसाय, होणार जंगी कमाई

OnePlus Nord 2 ची वैशिष्ट्ये आणि किंमत

 हा स्मार्टफोन आज संपूर्ण देशात लॉन्च करण्यात आला असून या स्मार्टफोनचे स्ट्रक्चर हे वन प्लस नोर्ड 2 सारखेच असून यामध्ये नवीन मीडियाटेक चीप फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये आठ जीबी रॅम आणि  128 जीबी स्टोरेज असून या 5 जी स्मार्टफोन ची किंमत 28 हजार 999 रुपये असून तो 5 जुलैपासून ॲमेझॉन वरून खरेदी करता येऊ शकतो.

तर याच एच बारा जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेल हे 33 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

नक्की वाचा:कमी बजेटचा स्मार्टफोन! अगदी लो बजेट Reality C30 फोन लॉन्च, जाणून घेऊ या फोनची वैशिष्ट्ये

 वन प्लस नोर्ड 2T मध्ये तुम्हाला अनेक अप्रतिम वैशिष्ट्ये दिले जात असून याच्या बॅटरी खूप पावरफुल असून यामध्ये तुम्हाला 4500mAh ची बॅटरी दिली जात आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा स्मार्टफोन 80W च्या फास्ट चार्जिंग सपोर्ट सह लॉन्च करण्यात आला असून आतापर्यंत हे फिचर फक्त 10R स्मार्टफोन मध्ये दिले गेले आहे.

याबाबत कंपनीने दावा केला आहे की हा फोन मध्ये एक बंडल चार्जर देखील आहे, ते 30 मिनिटात फोन 100 टक्‍के चार्ज करेल. तसेच या स्मार्ट फोनचा डिस्प्ले 6.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जात आहे. 

जो फुल HD+रिझोल्यूशन,HRD10+ सर्टिफिकेशन आणि 90Hz रिफ्रेशर रेट्सह लाँच केला गेला आहे.

नक्की वाचा:सावधान तुमचा आमचा आख्खा डिएनए मधेच बिघाड करण्याचे षडयंत्र,"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी"

English Summary: today launch oneplus nord 2T smartphone with many features and strong feature
Published on: 01 July 2022, 06:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)