Others News

मेष राशीच्या लोकांना आज समर्पण भावनेने काम करावं लागणार आहे. सहकाऱ्यांसोबत वाद झाल्यामुळे मानसिक अस्वस्थता असेल. घसा खवखवत राहील. आज तुम्हाला मित्राकडून मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला सकारात्मक ऊर्जाही मिळेल. लकी नंबर : 8, लकी कलर : Green

Updated on 14 September, 2022 6:00 PM IST

मेष

मेष राशीच्या लोकांना आज समर्पण भावनेने काम करावं लागणार आहे. सहकाऱ्यांसोबत वाद झाल्यामुळे मानसिक अस्वस्थता असेल. घसा खवखवत राहील. आज तुम्हाला मित्राकडून मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला सकारात्मक ऊर्जाही मिळेल. लकी नंबर : 8, लकी कलर : Green

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना नको असलेले बदल झाल्यामुळे सारं काही संपल्यासारखं वाटेल. आज नशिबाची परीक्षा घेऊ नका. एखाद्या महत्त्वाच्या विषयात तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. तुमच्या चुकांकडे पाहा आणि त्यांचा आढावा घ्या. लकी नंबर : 3, लकी कलर : White

मिथुन

आजचा दिवस कॉम्बिनेशन्स (combinations) आणि तडजोडींचा असेल. आज तुम्हाला नवे प्रयोग करून यश मिळेल; मात्र इतरांची मतंही विचारात घ्या. तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही परिस्थितीत बदल घडवून आणू शकाल. कष्टांना योग्य न्याय मिळेल. लकी नंबर : 8, लकी कलर : Blue

कर्क

आज कर्क राशीच्या लोकांना भोवतालच्या वस्तू आणि नातेसंबंध यांच्याशी अधिक जोडलेलं असल्यासारखं वाटेल. असुरक्षिततेच्या भावनेमुळे काही नकारात्मक विचार असतील. आयुष्यात प्रगती करण्याची इच्छा आणखी वाढेल; मात्र त्यामुळे तुम्ही स्वतःवर अधिक ताण निर्माण करत आहात. लकी नंबर : 8, लकी कलर : Grey

मान्सूनचा कहर! पुढील 3 ते 4 दिवस राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता

सिंह

सभोवतालच्या परिस्थितीमुळे तुम्ही क्रोधित होण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवा. आजचं एखादं तातडीचं काम पुढे ढकला. तुमच्या मूडमध्ये बदल झाल्यामुळे तुम्हाला छोट्या समस्यांपेक्षा मोठ्या समस्या दिसत आहेत. लकी नंबर : 3, लकी कलर : Light Green

कन्या

आजचा दिवस तुम्हाला अनुकूल आहे. आज तुम्हाला आध्यात्मिक कार्यात रस वाटेल. तुम्हाला कुटुंब आणि समाजात आदर मिळेल. आज तुम्हाला आयुष्याशी निगडित सर्व बाबींमध्ये संतुलन असल्याचं जाणवेल. आज तुम्ही सकारात्मक मार्गाने दिवस व्यतीत करू शकाल. लकी नंबर : 2, लकी कलर : Blue

तूळ

आज रेस्टलेसनेस आणि अधिक भावनिक विचार तुम्हाला घेरून टाकतील. स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवा. नातेसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतात. स्वतःचे निर्णय दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणं अवघड होईल. त्यामुळे मानसिक ताण वाढेल. लकी नंबर : 10, लकी कलर : White

वृश्चिक

जीवनात प्रकाशाकडे वाटचाल करत असताना मळलेल्या वाटेपेक्षा वेगळी वाट आजमावून पाहा. ज्याबद्दल तुम्ही काही निर्णय घेऊ शकत नव्हतात, त्या गोष्टींबद्दल आता स्पष्टता येऊ शकेल. लकी नंबर : 10, लकी कलर : Golden

शेतकरी मित्रांनो 'या' गाईचे करा पालन; दिवसाला देते 12 लिटरपेक्षा जास्त दूध

धनू

जुन्या कामांचं मूल्यमापन करण्याचा आजचा दिवस आहे. आपल्या स्वभावानुसार वर्तन आणि काम केल्यास तुम्हाला भविष्यात यश मिळेल. आज तुम्हाला आनंद मिळेल. कारण बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. टेन्शन कमी असेल. लकी नंबर : 3, लकी कलर : Sky Blue

मकर

आजचा दिवस पवित्र असून, सकारात्मकतेने भरलेला आहे. कामाच्या नव्या प्लॅनवर काम सुरू होईल किंवा महत्त्वाचं काम पूर्ण होऊ शकेल. तुम्ही मोठी उद्दिष्टं निश्चित करता; मात्र ती पूर्ण होण्याच्या दृष्टीने कष्ट कमी पडतात. त्यामुळे तुमची चिडचिड होते. लकी नंबर : 1, लकी कलर : Yellow

कुंभ

आज कुंभ राशीच्या लोकांना नवा उत्साह आणि प्रेरणा मिळेल. ऊर्जेच्या प्रवाहामुळे मन आनंदी असेल. नवी कामं सुरू करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. नवं काम सुरू करू शकाल. सकारात्मकतेमुळे आयुष्याला नवी दिशा देणं शक्य होईल. लकी नंबर : 5, लकी कलर : Blue

मीन

आज तुम्हाला विजय, सामाजिक सन्मान मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला रोल मॉडेल समजलं जाईल. भविष्याचं नियोजन करताना एखाद्याला आधी वर्तमानात स्वतःला स्थिर करावं लागेल. लकी नंबर : 7, लकी कलर : White

महत्वाच्या बातम्या 
मसाले, औषधे आणि चहामध्ये वापरल्या जाणार्‍या 'या' पिकाची लागवड करा आणि व्हा करोडपती
गुंठा, एकर, हेक्टरमध्ये शेत जमिनीची मोजणी कशाप्रकारे करतात? जाणून घ्या
'या' वनस्पतीची लागवड करून मिळवा भरघोस उत्पन्न; केंद्र सरकारही करतंय मदत

English Summary: Today Horoscope entire day beneficial
Published on: 14 September 2022, 05:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)