नोकरीच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या शोधार्थ गावाकडून तरुणांचे लोंढेच्या लोंढे शहरात जातात. यामध्ये बऱ्याच जणांची नोकरी करण्याची इच्छा देखील नसते, परंतू नाईलाजास्तव त्यांना करावी लागते.
आपल्या स्वतःच्या राहत्या गावात करता येतील असे भरपूर व्यवसाय असतात. त्यातल्या त्यात अगदी कमी गुंतवणुकीतून जास्त नफा देतील असे व्यवसाय खूप फायद्याचे अशा परिस्थिती ठरू शकतात.
या लेखामध्ये आपण ग्रामीण भागातील तरुणांना आपली शेती सांभाळून करता येतील असे काही व्यवसायांची आयडिया या लेखात दिली असून त्याचा तरूणांना नक्कीच फायदा होऊ शकतो.
गावात करता येण्यासारखे हे आहेत दोन व्यवसाय
1- कृषी वस्तू आणि पशुखाद्य उत्पादन व्यवसाय- गावातील बहुतेक लोक एक तर शेती करतात किंवा बरेच जण दुभती जनावरे जसे की गाई आणि म्हशी पाळतात. त्यामुळे या क्षेत्रातील व्यवसायात दररोज चांगले पैसे कमावता येऊ शकतात.
त्यामुळे गावातल्या गावात पशुखाद्याचा व्यवसाय केल्यास तो देखील फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच प्रमाणात पशु खाद्य उत्पादने आणि शेतीसाठी खतांचा आवश्यकता असते.
अशा परिस्थितीत गावातील व्यवसायासाठी कृषी साहित्य आणि पशुखाद्य उत्पादने विक्री हा व्यवसाय उत्तम पर्याय आहे.
2- इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीज स्टोअर व्यवसाय -आता जवळपास प्रत्येक घरात टीव्ही,लॅपटॉप,कंप्यूटर आणि मोबाइल तसेच तंत्रज्ञान आणि दळणवळणाची संबंधित बऱ्याच गोष्टी पोहोचले आहेत.
नक्की वाचा:दुग्ध व्यवसायात फायद्याच्या आहेत 'या' 50 लिटर दूध देणाऱ्या देशी गाई, वाचा सविस्तर माहिती
परंतु अजूनही बऱ्याच ग्रामीण भागांमध्ये सर्वात मोठी समस्या आहे की, या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब झाल्या तर त्यांना दुरुस्तीसाठी शहरात आणाव्या लागतात.
अशा परिस्थितीत गावात इलेक्ट्रॉनिक चे दुकान सुरू करण्याचा व्यवसाय देखील मोठे यश देऊ शकतो. जर आज कालच्या तरुणाईचा विचार केला तर बहुतांशी तरुण इलेक्ट्रॉनिक्समध्ये गुंतले आहेत,
त्यामुळे त्यांना त्यांची आवड जोपासत हा व्यवसाय करता येऊ शकतो व फायदेशीर ठरू शकतो.तसेच इलेक्ट्रॉनिक रिपेयरिंग दुकानाच्या सोबत संबंधित वस्तू विक्री आणि मोबाईल विक्री देखील करता येऊ शकते.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो हा चारा ठरतोय फायदेशीर, गाईच्या दुधात होईल दुप्पट वाढ
Published on: 24 June 2022, 12:01 IST