Others News

शेती संबंधित अनेक वाद उद्भवतात. शेताचे बांध कोरणे, शेतात जाणारा रस्ता एखाद्या शेतकऱ्याने आडवणे इत्यादी वाद सर्वसामान्यपणे शेतकरी वर्गामध्ये दिसून येतात. कधीकधी हे वाद इतके टोकाला जातात की कोर्टकचेऱ्या पर्यंत जाऊन पोचतात. यामध्ये शेतात जाणारा रस्ता हा खूप महत्त्वाचा असतो.

Updated on 18 September, 2022 4:39 PM IST

 शेती संबंधित अनेक वाद उद्भवतात. शेताचे बांध कोरणे, शेतात जाणारा रस्ता एखाद्या शेतकऱ्याने आडवणे इत्यादी वाद सर्वसामान्यपणे शेतकरी वर्गामध्ये दिसून येतात. कधीकधी हे वाद इतके टोकाला जातात की कोर्टकचेऱ्या पर्यंत जाऊन पोचतात. यामध्ये शेतात जाणारा रस्ता हा खूप महत्त्वाचा असतो.

कारण शेतीला लागणारे आवश्यक गोष्टी जसे की विविध प्रकारचे रासायनिक खते बी-बियाणे, शेतीच्या मशागतीसाठी लागणारे ट्रॅक्टर, उत्पादित शेतमाल शेतातून बाजारपेठेपर्यंत किंवा घरापर्यंत आणण्यासाठी वाहन जाण्यासाठी रस्ता हा लागतो.

परंतु बऱ्याचदा रस्त्याच्या संबंधित वाद उद्भवतात व काही शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याचा रस्ता बंद करतात. यासाठी काही कायदेशीर बाबी असून ते आपण समजून घेऊ.

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना! भाजीपाला निर्यात करायचा असेल तर लागणार या कागदपत्रांची आवश्यकता

 शेतातील रस्ता अडवला तर आवश्यक कायदेशीर गोष्टी

 एखादा शेतकऱ्याचा रस्ता  पूर्वापार वापरात असेल तर तो कोणालाही अडवता येत नाही. त्यासाठी तहसीलदाराकडे मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 कलम पाच अनुसार अर्ज दाखल करावा लागतो व ज्या व्यक्तीने रस्ता आडवला आहे त्याला प्रतिवादी करावी लागते. यामध्ये रस्ता अडवण्याची घटना घडल्याची तारीख व वेळ सविस्तर माहिती लिहावी लागते.

यामध्ये साक्षीदार असतील तर त्यांचे नाव टाकावे लागते व त्याच्याखाली व्हेरिफिकेशन अर्थात सत्यापन करावे लागते व योग्य ते कोर्ट फी स्टॅम्प लावावी लागतात. सोबत दोन्ही शेताचा सातबारा जोडावे व कच्चा नकाशा तलाठ्याकडून घेऊन तो अर्जात जोडावा.

यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रस्ता अडवल्याच्या घटनेपासून सहा महिन्याच्या मुदतीत अर्ज दाखल करावा लागतो.जुना रस्ता असून तो अडवू नये यासाठी तहसीलदारांना मामलेदार न्यायालय कायदा 1906 कलम 5 नुसार शेतकऱ्यांना रस्ता पूर्ववत करून देण्याचा अधिकार आहे.

नक्की वाचा:Crop Cultivation: 'अशा'पद्धतीने करा शेवग्याची लागवड, मिळेल भरपूर उत्पादन आणि नफा

एवढेच नाही तर जुना रस्ता जरी नसेल तरी जमीन महसूल कायदा कलम 143 नुसार कोणत्याही शेतकऱ्यांना जमीन कसण्यासाठी रस्त्याची मागणी करता येऊ शकते व ही मागणी तहसीलदार यांना करावी लागते.

आपण वहिवाट कायदा 1982 कलम 15 नुसार विचार केला तर वीस वर्ष अधिक काळ जर कोणत्याही रस्त्यावरून म्हणजेच तो शेतात जाण्याचा रस्ता असो की घराकडे जाण्याचा रस्ता त्या रस्त्यावरून जाण्यासाठी अधिकार प्राप्त होतो.

असा रस्ता अडवल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो. रस्त्यावरून जाताना अडवणूक करणे हा भादवि कलम 341 नुसार गुन्हा होतो.यासाठी कायदेशीर प्रक्रिया साठी एखाद्या तज्ञ वकिलाची मदत घेणे खूप महत्त्वाचे असते.

नक्की वाचा:Machinary: 'या' यंत्राच्या साह्याने ऊसातील आंतरमशागत होईल सोपी,वाचेल खर्च आणि वेळ

English Summary: this is legal process for releted matters about farm road
Published on: 18 September 2022, 04:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)