इंधन दरवाढीची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पेट्रोल-डिझेलचे (Petrol-diesel) भाव दररोज वाढत आहेत. यावर उपाय म्हणून लोक आता इलेक्ट्रिक कारला (Tata Electric Car) प्राधान्य देत आहे. मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक कार आहेत. पण आता टाटाची सिएरा इलेक्ट्रिक कार चार्जिंगचे सगळे रेकॉर्ड मोडणार आहे.
चार्जिंगचे सगळे रेकॉर्ड मोडणार
कंपनीने स्वतः कारबाबत माहिती दिली आहे. कार लवकरच रस्त्यांवर फिरताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कार एका चार्जमध्ये ५९० किमीची रेंज देणार आहे. टाटा इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहे.
टाटा इलेक्ट्रिक कारचे फिचर
या इलेक्ट्रिक SUV कारमध्ये ६९kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी दोन विभागात विभागली गेली आहे. तसेच ही कार FWD (सिंगल इलेक्ट्रिक मोटर) आणि AWD (दोन इलेक्ट्रिक मोटर्स) या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. पॉवर आउटपुटची माहिती कंपनी लाँचिंगदरम्यान देणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
आता मराठवाड्याचे टेन्शन मिटले; फळपिकाबाबात राज्य सरकारचा मोठा निर्णय
शेतकऱ्याचा नादच खुळा; घोड्यांना जुंपले औताला, मशागत झटक्यात उरकली
या कारची लांबी ४.१ मीटर आहे, ज्यामुळे ही कार ह्युंदाई क्रेटाच्या तुलनेत कॉम्पॅक्ट बनते. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, व्हिडिओमध्ये दिसते कारमध्ये १२.१२ इंच टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे. यात IRA Place Pro Connect फिचर आहेत. हे ७.७ इंच एडीएम प्रो प्लाझ्मा स्क्रीन वापरते, जे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. तसेच, या कारला एक मोठे पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात आले आहे.
या कारला ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा मिळेल, ज्याच्या मदतीने ही कार सहज पार्क करता येईल. तसेच या कारसाठी १९ इंची चार अलॉय व्हील वापरण्यात आली आहेत. या कारमध्ये हाय स्पीड वॉर्निंग सेन्सर आहे. तसेच यूजर्सना टर्न इंडिकेटर आणि दरवाजा उघडण्याचा इशारा देणारा साऊंडदेखील मिळेल.
टाटा इलेक्ट्रिक कारची किंमत
एक्सपोमध्ये नेक्स्ट जनरेशनमधली टाटा सिएरा इलेक्ट्रिक कारचे लाँचिंग करणार आहे. तसेच कंपनीने त्याचे प्री-बुकिंग सुरू केले आहे. याची किंमत १४ लाखांपर्यंत असून शकते.
Published on: 04 April 2022, 04:07 IST