सरकारी कर्मचारी तसेच फॅक्टरी मध्ये काम करणारे व कार्यालयीन कर्मचारी आणि कामगार त्यांच्यासाठी एक आनंददायक बातमी आहे.
ती म्हणजे आता केंद्र सरकार या सगळ्या कर्मचाऱ्यांची सहा दिवसांच्या कामातून मुक्तता करणार असून त्यांची एकूण पगार आणि निवृत्तीवेतन यामध्ये देखील बरेच बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे नवीन नियम आठवड्यातील कामाचे एकूण दिवस, त्यांच्या पगाराचे स्वरूप आणि निवृत्तीवेतन संबंधी काही बदल करण्यात येणार आहेत यासंबंधी आहेत. यानुसार आता कर्मचाऱ्यांचा कामाचा आठवडा हा चार दिवसांचा आणि तीन दिवस सुट्टी अशा प्रकारचा असेल. पण यामध्ये कामाचे तास हे जास्त असतील. हे नवीन वेतन संहिता एप्रिल महिन्यातच लागू करण्याचा विचार सरकारचा होता परंतु काही राज्य सरकारांच्या असहकार्य धोरणामुळे ते पुढे ढकलण्यात आले होते व आता 1 जुलैपासून हा नियम लागू करण्यात येत असल्याचे वृत्त 'झी न्यूज' ने दिले आहे.
नियमांमध्ये हे बदल होतील
1- वार्षिक सुट्ट्यांमध्ये होणार वाढ- या सगळ्या नवीन नियमांचा फायदा कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात होणार असून त्यांच्या वार्षिक सुट्ट्यांमध्ये आता वाढ होऊन तब्बल 60 जास्तीच्या सुट्ट्या कामगारांना मिळणार आहेत.
3- कामाच्या दिवसांसंबंधी नियम- आठवड्यातील किती तास काम करावे याचे सगळे व्यवस्थापन कर्मचार्यांनी संबंधित व्यवस्थापन ठरवेल परंतु रोजच्या आठ तासांच्या हिशोबाने एक दिवसाची सुट्टी गृहीत धरून कामाचे तास 48 होतील आणि एखाद्या व्यवस्थापनाला दररोज बारा तास कर्मचाऱ्याला बोलवता येईल.
परंतु तीन दिवसांची सुट्टी त्याला द्यावी लागेल.रोज आठ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला आठवड्यातून एक दिवस सुट्टी देता येईल. यासाठी कर्मचारी आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे असून तेव्हाच ही प्रक्रिया राबवता येईल. तसेच दैनंदिन कामाचे तासही कर्मचाऱ्यांच्या परवानगीने ठरतील असे देखील या नवीन वेतन संहितेत स्पष्ट केले आहे.जर एखाद्या कर्मचाऱ्याने आठवड्यात 48 तासांपेक्षा जास्त काम केले तर त्याला नियमाप्रमाणे ओव्हर टाईम चा लाभ देखील देण्यात येईल.
Published on: 25 June 2022, 06:47 IST