पुणे : राज्याच्या राजकारणात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट शिवसेनेत झाले आहेत. अनेकांना वाटत आहे की, हे दोन्ही गट एकत्र यावेत. मात्र, एका लग्नपत्रिकेने हे जमवून आणले आहे. कसे ते पाहू...
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या वडगाव सहानी येथील ठाकरे – शिंदे यांच्या लग्नाची पत्रिका चांगलीच व्हायरल होत असुन यांचा शुभ विवाह सोहळा पार पडणार आहे.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कटुता विसरून पुन्हा एकत्र यावे अशी अपेक्षा शिंदे कुटुंबाने या निमित्ताने व्यक्त केली आहे.
जुन्नरच्या वडगाव सहानी येथील विशाल शिंदेचा आंबेगाव येथील साल गावच्या अनुराधा ठाकरे हिच्याशी विवाह ठरला आहे. या निमित्ताने शिंदे आणि ठाकरे कुटुंब एकत्र येणार आहेत. त्यांची सोयरीक होत आहे.
हमीभाव कायद्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक; अधिवेशनाला सुरुवात
जुन्नर तालुक्यातील वडगाव सहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या अनुराधा यांचा शुभविवाह ८ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे.
देशात जोपर्यंत किमान हमीभाव कायदा लागू होत नाही, तोपर्यंत शेतकरी आर्थिक संकटात : राजू शेट्टी
लग्नपत्रिकेमुळे पुणे जिल्ह्यात सध्या शिंदे व ठाकरे यांच्या नव्या नातेसंबंधामुळे सर्व सामान्य लोकांमध्ये या सध्याच्या राजकीय तणावाच्या वातावरणात ही लग्नपत्रिका पाहून चेहर्यावर आनंद पहायला मिळत असून चांगलीच करमणूक होत आहे एवढं मात्र नक्की.
या दिलजमाईमुळे नागरिकांचे मात्र चांगले मनोरंजन होत आहे. जुन्नरच्या ठाकरे आणि शिंदे यांचं एकत्र येण्याचं ठरलंय. त्यांना शुभेच्छा!
राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आखली रणनीती; आता...
Published on: 07 October 2022, 07:31 IST