उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असताना तेव्हा पाण्याची खूप तहान लागते. तेव्हा गार अशा थंड पाण्याची कल्पना जरी डोक्यात आली ना तरीमनाला कसे वाटते हे शब्दात सांगणे कठीण आहे.तसे पाहायला गेले तर पाण्याला जीवन असे म्हटले जाते.
अशाच या जीवनाचाम्हणजेच हा पाण्याचाव्यवसायाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर खूप चांगल्या प्रकारे पैसा मिळवता येऊ शकतो.आपल्याला माहित आहेच की भारतामध्येमिनरल वॉटरच्या भरपूर अशा कंपन्या आहेत.यामध्येदहा रुपयापासून वीस रुपये पर्यंत थंडगार पाण्याची बाटली, पाण्याचे पाऊच ते जार बाजारामध्ये मिळतात. या लेखामध्ये आपण अशाच आरओ वाटर प्लांट व्यवसाय विषयी माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:कधी नव्हे ते पुणे जिल्हात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी, काय आहेत कारणे, वाचा...
या व्यवसायाची योजना अशी आखावी
1-सगळ्यात आगोदर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर एक कंपनी तुम्हाला स्थापन करावी लागते.
2-तसेच कंपनी कायद्यानुसार या कंपनीचे रजिस्ट्रेशन करून घेणे चांगले असते.
3-आपल्याला कंपनीच्या नावाचा पॅन नंबर आणि जीएसटी नंबर द्यावा लागतो कारण तो आवश्यक आहे.
4- तसेच यासाठी हजार ते पंधराशे स्केअर फूट जागेची आवश्यकता असते कारण या जागेमध्ये बोर, आरो प्लांट आणि चिलर मशीन तसेच पाण्याच्या टाकी ठेवण्यासाठी जागेची आवश्यकता असते.
वॉटर प्लांट कसा सेट अप करावा?
1- पाण्याची निवड करताना अशा जागेची निवड करावी की जिथे पाण्याचा टीडीएस लेवल जास्त असणारनाही.
2-त्यानंतर बर्याच प्रकारचे परवानग्या आणि आयएसआय नंबर लागतो.कारणत्यासाठी आयएसआय नंबर असणे फार आवश्यक आहे.
3- बाजारामध्ये अशा बऱ्याच कंपन्या आहेत की त्या व्यावसायिक आरो प्लांट बनवतात. अशा आरो प्लांट ची किंमत ही 50 हजार रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंत असते.
4- एका आरो प्लांट साठी कमीत कमी वीस लिटर क्षमतेचेशंभर ते सव्वाशे जार असणे गरजेचे आहे.
5- सगळा या खर्चाचा अंदाज पकडला तरचार ते पाच लाख रुपयांपर्यंत खर्च येतो.
6- यासाठी तुम्हाला बँक देखील कर्ज देते त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन चौकशी करावी लागते आणि त्यासाठीकर्जासाठी आवश्यक असणारा अर्जं करावा लागतो.
नक्की वाचा:ब्रेकिंग! PM kisan Yojna; पीएम किसान योजनेत मोठा बदल, शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
7-जर एका प्लांटमध्ये एका तासात एक हजार लिटर पाणी शुद्ध होत असेल तर तुम्ही कमीत कमी तीस ते पन्नास हजार रुपये कमवू शकतात.
आरो प्लांट टाकण्यासाठी कर्जाची सुविधा
या व्यवसायासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज देखील उपलब्ध आहे.तुम्ही तुमचे दहा लाख रुपयांपर्यंतचे लोन प्रपोजल बँकेला सादर करू शकतात.यासाठी तुम्हाला स्टेट बँक मुद्रा लोन च्या माध्यमातून आर्थिक मदत करू शकते. यासाठी तुमच्याकडे दीडशे नियमित ग्राहक असणे गरजेचे आहेत जे ग्राहक प्रतिव्यक्ती एक शुद्ध पाण्याचा एक जार तुमच्याकडून विकत घेतात. जर एक जार ची किंमत पंचवीस रुपये पकडले तर तुम्ही सहजतेने एक लाख 12 हजार 500 रुपये पर्यंत कमाई करू शकतात. यामध्ये इतर खर्च वजा जाता 20 ते 25 हजार रुपये आरामात मिळतात.
डीलरशिप घेऊन करू शकता हा व्यवसाय
मिनरल वाटर व्यवसायामध्ये खूप सार्या कंपनी आहेत. यामध्ये बिसलेरी सारख्या कंपन्या या ब्रांड असून या कंपन्यांच्या माध्यमातून अगदी 200 एम एल च्या सुद्धा पाण्याच्या बाटल्या उपलब्ध आहेत. तसेच काही कंपन्या वीस लिटरचा जार सुद्धा पुरवतात. अशा कंपन्यांची डिस्ट्रीब्यूटर शिप घेऊन सुद्धा हा व्यवसाय आरामात करता येतो परंतु त्यासाठीपाच ते दहा लाख रुपये गुंतवणूक करावी लागते.परंतु यामध्ये चांगला नफा मिळू शकतो.
Published on: 27 March 2022, 02:02 IST