Others News

आपल्याकडे शेती असावी असे अनेकांना वाटत असते. परंतु पैसा आणि पाण्याची सोयमुळे शेती घेण्याची स्वप्न पुर्ण होत नाही. शेत जमीन घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एसबीआय म्हणजेच भारतातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी एक योजना आणली आहे.

Updated on 03 March, 2021 2:37 PM IST

अनेकांना आपल्याकडे शेती असावी असे वाटत असते. परंतु पैसा आणि पाण्याची सोयमुळे शेती घेण्याची स्वप्न पुर्ण होत नाही. शेत जमीन घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एसबीआय म्हणजेच भारतातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी एक योजना आणली आहे. यामुळे शेती घेणे सोपे होणार आहे.  अल्पभूधारकांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरणार असून शेत घेण्याचे त्यांचे स्वप्न यातून पूर्ण होणार आहे.

या योजनेत बँकेकडून जमीन खरेदी करण्यासाठी एसबीआय ८५ टक्के पैसे देणार आहे. तर शिल्लक असलेले १५ टक्के रक्कम तुम्हाला द्यावी लागेल.  या योजनेचे अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे शेतकऱ्यांना पूर्ण जमिनीचे पैसे फेडण्यासाठी ७ ते १० वर्षाची मुदत दिली जाते.  बँकेचे पूर्ण पैसे फेडल्यानंतर जमीन तुमच्या मालकीची होते. अशा महत्त्वपूर्ण  योजनेचा कसा फायदा घ्यायचा याची माहिती आज या लेखातून आपण घेणार आहोत..

योजनेचे उद्दिष्ट-

एसबीआय लँड परचेस स्कीम चा उद्देश हा आहे की, छोट्या शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यास मदत करणे. किंवा ज्यांच्याकडे शेती करण्यायोग्य जमीन नाही अशा शेतकऱ्यांना जमीन घेण्यासाठी मदत केली जाते. या योजनेचा लाभ घेताना किंवा या योजनेतून कर्ज घेण्यासाठी एक अट आहे. अर्जदारावर कोणत्या दुसऱ्या बँकेचे कर्ज नसावे.

हेही वाचा:कृषी ग्राहकांपर्यंत जास्त फायदा पोहोचवण्यासाठी सरकार राबवणार कृषी ऊर्जा पर्व

कोण करु शकते अर्ज - ज्या शेतकऱ्यांकडे २.५ एकर पेक्षा कमी सिंचित जमीन आहे, ते अर्जदार किंवा शेतकरी एलपीएस योजनेसाठी अर्ज करु  शकतील.  यासह ज्यांच्या कडे शेती नाही असे भूमीहीन शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करु शकतील.  कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडे साधरण दोन वर्षाचे कर्ज परत फेडचा रेकॉर्ड पाहिजे. यासह एसबीआय शेत जमीन खरेदी करण्यासाठी दुसऱ्या बँकेकडून घेतले फेडलेले असल्यास त्यांनाही प्राधान्य देण्यात येईल.

कोणते मिळतील लाभ -  या योजनेच्या अंर्तगत शेत जमिनीच्या एकूण ८५ टक्के रक्कमेचे कर्ज घेतले जाऊ शकते. ही रक्कम बँक देणार आहे, तर आपल्याला फक्त १५ टक्के रक्कम द्यावी लागणार आहे. कर्ज जेव्हापर्यंत फेडल्या जात नाही त्या काळापर्यंत जमीन बँकेच्या नावावर राहिल.  त्यानंतर कर्ज फेडल्यानंतर जमीन तुमच्या मालिकीची होईल. विशेष म्हणजे या योजनेत आपल्याला एक ते दोन वर्ष मोफत मिळतात.   जर जमीन शेतासाठी तयार केलेली नसेल तर त्याला तयार करण्यासाठी दोन वर्ष बँक आपल्याला मोफत देत असते. तर जर जमीन आधीपासून विकसीत असेल तर त्यासाठी बँक तुम्हाला एक वर्ष मोफत देते.  हा काळ संपल्यानंततर आपल्याला सहा महिन्यात हप्ता द्यावा लागतो.  कर्ज घेणारा व्यक्ती हा ९ ते १० वर्ष रीपेमेंट करु शकतो.

English Summary: Scheme of farmers: It is easy to get agricultural land, the bank will give 85% of the amount
Published on: 23 July 2020, 10:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)