भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने नवीन मुदत ठेव योजना सुरू केली असून या योजनेचे नाव 'उत्सव ठेव' असे ठेवले आहे. ही योजना भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदार जे काही ठेव ठेवतील त्या ठेवीवर 6.1टक्के व्याज बँकेकडून देण्यात येणार आहे. .
बँकेने सुरू केलेली ही उत्सव योजना 15 ऑगस्ट पासून संपूर्ण देशात लागू होणार असून योजना पंच्याहत्तर दिवसांसाठी लागू असणार आहे. या कालावधीत तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. म्हणजे 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
काय आहे या योजनेचे स्वरूप?
स्टेट बँकेनुसार, या उत्सव ठेव योजनेचा कालावधी एक हजार दिवसांचा असेल व ग्राहकांना 6.10टक्के व्याज या माध्यमातून मिळणार आहे. 15 ऑगस्ट पासून पुढील पंच्याहत्तर दिवस या योजनेसाठी गुंतवणूकदारांना अर्ज करता येणार आहे.
योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, जसे इतर मुदत ठेवींवर सर्वसामान्यांच्या तुलनेने ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज दिले जाते त्याचप्रमाणे या उत्सव ठेव योजनेमध्ये देखील जास्त व्याजाचा फायदा मिळणार आहे.
या योजनेमध्ये जेष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. स्टेट बँकेचे साधारणत सहा-सात दिवस ते दहा वर्षाच्या कालावधीसाठी एफडी साठीचा व्याजदर हा 2.90 टक्के ते 5.65 टक्के इतका आहे.
स्टेट बँकेने मागील काही दिवसां अगोदर एफडी योजनांचे व्याजदर वाढवले असून ही वाढ पंधरा बेसिस पॉईंट पर्यंत करण्यात आली आहे. स्टेट बँकेच्या म्हणण्यानुसार वाढलेले व्याजदर 13 ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत.
Published on: 17 August 2022, 02:28 IST