सॅमसंग कंपनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या कंपनीने आता भारतामध्ये क्रेडिट कार्ड लॉन्च केले असून यासाठी सॅमसंग कंपनीने अॅक्सिस बँकेसोबत भागीदारी देखील केली आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आता ग्राहक आता सॅमसंग कंपनीची उत्पादने खरेदी करण्यासाठी सक्षम असतील. या लेखात आपण या क्रेडिट कार्ड विषयी माहिती घेऊ.
सॅमसंग कंपनीच्या क्रेडिट कार्डचे फायदे
सॅमसंग ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड द्वारे आता ग्राहकांना सॅमसंग कंपनीच्या उत्पादनांवर दहा टक्के सवलत मिळणार आहे. एवढेच नाही तर इएमआय आणि नॉन इएमआय पेमेंटवर दहा टक्के कॅशबॅक उपलब्ध असणार आहे.
सॅमसंग क्रेडिट कार्ड तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीचे फायदे देऊ शकते. याबाबत सॅमसंग कंपनीची माहिती दिली की, ज्या ज्या ठिकाणी सॅमसंग कंपनीची उत्पादने असतील त्या ठिकाणी तुम्हाला या कार्डद्वारे उत्पादन व 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. त्यासोबतच सॅमसंग कंपनीचे सर्विस सेंटर आणि वेबसाईटवर देखील हे कार्ड उपयोगी ठरेल.
या कार्डाच्या माध्यमातून सॅमसंग उत्पादनांवर संपूर्ण वर्षभर 10 टक्के कॅशबॅक मिळेल. परंतु यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे सॅमसंग ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डधारकांना वर्षभरात त्यांच्या कार्ड वरून फक्त दहा हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकणार आहे. हे कार्ड दोन प्रकारात लाँच करण्यात आले असून यामध्ये व्हिसा सिग्नेचर आणि व्हीसा इन्फिनिटी यांचा समावेश आहे.
या मधील व्हिसा सिग्नेचर कार्डच्या माध्यमातून एका वर्षात दहा हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे तर व्हिसा इन्फिनिटच्या माध्यमातून ग्राहकांना एका वर्षात 20 हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकेल. व्हिसा सिग्नेचरच्या माध्यमातून एका महिन्यात जास्तीत जास्त दोन हजार 500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल तर व्हिसा इन्फिनिट कार्डाच्या माध्यमातून एका महिन्यात पाच हजार रुपया पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी खास योजना; आता पोस्ट ऑफिसच्या किसान विकास योजनेत शेतकऱ्यांचा पैसा होणार डबल
Published on: 27 September 2022, 03:18 IST