सॅमसंग ही कंपनी मोबाईल निर्मिती क्षेत्रातही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून सॅमसंगची सगळ्या प्रकारची उत्पादने ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय असतात.जर आपण स्मार्टफोन वापरणार्या ग्राहकांचा विचार केला तर बहुतांशी लोकांची पसंती सॅमसंगच्या स्मार्टफोनची जास्त असते.
त्यामुळे सॅमसंगच्य पसंती असलेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी असून सॅमसंगने भारतात ' गॅलेक्सी M32 प्राईम एडिशन' लॉन्च केला आहे. या लेखामध्ये आपण या स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये जाणून घेऊ.
सॅमसंगच्या या नवीन स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
M32 प्राईम एडिशन 2 स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून त्यातील पहिला म्हणजे चार जीबी रॅम आणि चौसष्ठ जीबी स्टोरेज आणि दुसरा म्हणजे सहा जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज असे या फोनचे दोन व्हेरिएंट आहेत.
सॅमसंग कंपनीने या स्मार्टफोनच्या बाबतीत 24 तास इंटरनेट वापर, 25 तासाचा व्हिडिओ प्ले टाईम आणि 130 तास म्युझिक प्ले टाईम आणि सुमारे चाळीस तास व्हाईस कॉलचा दावा केला आहे. या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्याला 6.4 इंचाचा AMOLED आणि इन्फिनिटी-U- नोच डिस्प्ले देण्यात आला आहे.
एवढेच नाही तर फुल एचडी त्यासोबतच रिझोल्युशनसह मोबाईलचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा स्मार्टफोन गोरिला ग्लास संरक्षणासह 18Wटाईप सी अडेप्टर द्वारे चार्ज होईल.
या स्मार्टफोनमध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असून 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि मागच्या साईडला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. रियर कॅमेरा मध्ये 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेन्स, दोन मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आणि दोन मेगापिक्सल डेप्थ सेन्सर यामध्ये उपलब्ध आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये वाय फाय, ब्लूटुथ,3.5 मी मी ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. तसेच यामध्ये एसडी कार्ड स्लॉट देखील दिला गेला आहे. हा स्मार्टफोनला डुएल सिम सपोर्ट आहे.
या फोनची किंमत
या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत अकरा हजार 499 रुपये असून 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13 हजार 499 रुपये इतकी आहे.
Published on: 19 October 2022, 08:48 IST