आजच्या राशीभविष्यात चंद्राच्या संचारामुळे मिथुन राशीच्या (Gemini) लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल, तर कन्या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. चला जाणून घेऊया मेष ते मीन या सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा असेल.
मेष रास
आज मेष राशीच्या लोकांचे भाग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या अनुयायी आणि नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवाल. मित्रांसोबत दिवाळीसाठी घरगुती वस्तूंची खरेदी कराल. तसेच मुलांना नवीन कपडे मिळू शकतात. आज भाग्य ९६ टक्के तुमच्या बाजूने असेल.
वृषभ रास
वृषभ राशीचे लोकं आज चांगल्या लोकांशी संपर्क (contact) साधतील. जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. नवीन संवाद तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. आज नशिबाला चांगली साथ मिळेल. कुटुंबीयांसह दिवाळीच्या सणाची तयारी पूर्ण करणार. आज तुमचे भाग्य ८२ टक्के सोबत असेल.
मिथुन रास
मिथुन राशीचे लोकं या दिवशी ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर राहतील. आज तुमचे भाग्य तुमच्या प्रतिभेतून जागृत होईल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. दिवाळीच्या कामासाठी गर्दी होऊ शकते आणि घराच्या स्वच्छतेवर भर असेल. आज भाग्य तुम्हाला ७६ टक्के साथ देईल.
कर्क रास
आज तुमची वागणूक अतिशय सौम्य असणार आहे, वर्तनातील बदल इतरांसाठी चर्चेचा विषय बनेल. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी परिश्रमपूर्वक काम कराल आणि एखाद्याच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ होईल. भाग्याची आज ९०% साथ राहील. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.
शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; या जिल्ह्यात लम्पीने 10 जनावरांचा मृत्यू तर 110 जनावरे बाधित
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस कामात चांगले यश मिळवून देणारा आहे, तुमची मेहनत आणि नशीब प्रत्येक प्रकारे साथ देईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुमची तब्येत बिघडू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत घालवाल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली भेट मिळू शकते. नोकरीत बदलाची योजना पूर्ण होईल. आज भाग्य ७२ टक्के तुमच्या सोबत असेल.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांना या दिवशी नशिबाची पूर्ण साथ (Full of luck) मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगला वेळ जाईल. घरात पाहुण्यांच्या आगमनाने वातावरण प्रसन्न राहील आणि दिवाळीसाठी घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. तुमच्या मनात तुमचे शिक्षक आणि वडीलधाऱ्यांबद्दल आदराची भावना वाढेल. आज ८१ टक्के भाग्य तुमच्या सोबत आहे.
तूळ रास
या दिवशी तुम्ही तुमची बुद्धिमत्ता (Intelligence) आणि हुशारी दाखवून तुमची कामे सहज पूर्ण करू शकाल. बोलण्यात गोडवा राहील, त्यामुळे मित्र-मैत्रिणींसोबतच्या नात्यात गोडवा येईल. आज तुमच्या घरात कोणतेही धार्मिक कार्य पूर्ण होईल. आज तुमच्या जिद्दीमुळे कुटुंबाला त्रास होऊ शकतो. मित्रांसोबत कुठेतरी जाण्यावरून वाद होऊ शकतो. आज भाग्याची ८० टक्के साथ असेल.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांना दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली होणार आहे. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळेल. नोकरदार लोकांनाही सहकाऱ्यासोबत मिळून केलेल्या कामात चांगला फायदा होईल. कोर्टाशी संबंधित कोणतेही प्रकरण चालू असेल तर आज तुम्हाला त्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज ९५ टक्के भाग्य तुमच्या सोबत असेल.
परतीच्या पावसाचा धुमाकूळ; सोयाबीन, भुईमूग, कांदा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
धनु रास
धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस कामासाठी चांगला आहेत. नवीन सहकाऱ्याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये अचानक यश मिळेल. व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली राहील, पण अचानक खर्चही वाढणार आहेत. दिवाळीनिमित्त घराच्या सजावटीकडे लक्ष दिले जाईल आणि जीवनावश्यक वस्तूंचीही खरेदी होईल. आज ८६ टक्के भाग्य तुमच्या सोबत आहे.
मकर रास
मकर राशीच्या लोकांचे आज कोणाशी तरी विनाकारण भांडण होईल. आईसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो, रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याबद्दल बोलायचे तर आज तुमचे आरोग्य अनुकूल राहील. शरीरात चपळता असेल, नोकरी असो किंवा व्यवसाय, आज तुम्हाला चांगली कामगिरी मिळेल. आजचा दिवस कामाच्या ठिकाणी फायदेशीर ठरेल. आज तुमचे भाग्य ८५ टक्के साथ देईल.
कुंभ रास
आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या हुशारीने तुमची सर्व कामे अगदी सहजतेने पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. दिवाळीच्या निमित्ताने कुटुंबात काही खास पदार्थही बनवले जातील. नोकरीत सहकाऱ्याच्या मदतीने काही नवीन शिकण्याची संधी मिळेल, मनामध्ये आनंद राहील. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या.
मीन रास
मीन राशीचे लोकांवर आज शत्रूंचे वर्चस्व राहील, परंतु त्यांचा पराभव करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नशीब आज तुमची साथ देणार आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेर जाल आणि चांगला पाठिंबा मिळेल. आरोग्यासाठीही आजचा दिवस चांगला आहे. आज भाग्य ७० टक्के तुमच्या बाजूने असेल.
महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! बनावट खतांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल
दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना दिलासा; 'या' जिल्ह्यातील 55 हजार शेतकऱ्यांना 200 कोटींचे प्रोत्साहन अनुदान
कांद्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते? जाणून घ्या अहवाल
Published on: 21 October 2022, 02:34 IST