Others News

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर सर्व ग्रह वक्री होतात. त्यामुळे त्या त्या राशींवर तसा प्रभाव पडतो. जुलैपासून शनिदेव मकर राशीत वक्री होते. आजपासून शनिवदेव मकर राशीत मार्गस्थ झाले आहेत.

Updated on 23 October, 2022 6:04 PM IST

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर सर्व ग्रह वक्री होतात. त्यामुळे त्या त्या राशींवर तसा प्रभाव पडतो. जुलैपासून शनिदेव मकर राशीत वक्री होते. आजपासून शनिवदेव मकर राशीत मार्गस्थ झाले आहेत.

1) वृषभ

शनिदेव मार्गस्थ झाल्याने वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात अडचणी वाढू शकतात. या काळात प्रत्येक कामात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खर्चात देखील वाढ होऊ शकते.

2) कर्क

शनिदेव मार्गस्थ झाल्याने कर्क राशीच्या लोकांना जीवनात अनेक समस्या येतील. नोकरी-व्यवसायात चढ-उतार होऊ शकतात. या काळात आर्थिक अडचण वाढेल आणि उत्पन्न कमी होईल. आपल्या बोलण्याने मन दुखू शकतं म्हणून बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

सावधान! पुढच्या 24 तासात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

3) कन्या

या काळात मार्गस्थ शनि अडचणीत वाढ करेल. कामे न झाल्याने निराशा येऊ शकते. अचानक अडथळे वाढतील. या काळात आरोग्याची काळजी घ्या. घरात वाद होऊ शकतात.

4) मकर

मकर राशीतच शनि मार्गस्थ झाला आहे. या राशीवर शनिची साडेसातीही सुरू आहे. या लोकांना मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो.

भारताकडून तांदूळ निर्यातीवर बंदी; तांदळाच्या किमतीत 10% टक्क्यांनी वाढ

5) कुंभ

शनि मार्गस्थ झाल्याने कुंभ राशीच्या लोकांना त्रास देईल. आरोग्याची चांगली काळजी घ्या. करिअरमध्ये चढउतार येऊ शकतात. विशेषतः इतरांच्या व्यवहारात अजिबात पडू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. 

महत्वाच्या बातम्या 
वजन आणि पोटाची चरबी कमी करा 'या' महत्वाच्या टिप्सने; जाणून घ्या सविस्तर
खुशखबर! आता पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूकदारांना मिळणार 'ही' महत्वाची सुविधा
काय सांगता! सोन्या-चांदीपेक्षा महाग आहे 'हे' लाकूड; किंमत ऐकाल तर व्हाल चकित

English Summary: problems these five people likely increase complete horoscope
Published on: 23 October 2022, 06:01 IST