ज्यांचे पोस्ट ऑफिस बचत खाते आहे अशा खाते धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पोस्ट ऑफिसचे ग्राहक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर करू शकणार आहेत
म्हणजे आता 31 मे 2022 पासून ग्राहकांना आरटीजीएस ची सुविधा मिळण्यास सुरुवात होईल. म्हणजे एक जून पासून ग्राहकांना या नवीन सेवेचा लाभ मिळू शकणार आहे. आता पोस्ट ऑफिस खात्यामधून ग्राहकांना ऑनलाइन पैसे पाठवणे पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे.
यासंबंधी पोस्ट ऑफिसने अधिसूचनेत म्हटले आहे की, NEFT ची सेवा 18 मे पासून सुरू झाले आहे. त्याचवेळी RTGS ची सेवा 31 मे पासून ग्राहकांना मिळण्यास सुरुवात होणार आहे. सध्या आरटीजीएस ची सेवेची चाचणी सुरू असून पोस्ट ऑफिस बचत खाते धारकांना या सुविधेचा फायदा होईल कारण ऑनलाइन पैसे आता हस्तांतरित करणे सोपे होणार आहे.
एन एफ टी करण्यासाठी इतके शुल्क आकारले जाईल
1- दहा हजार ते एक लाख रुपये - पाच रुपये आणि प्लस जीएसटी
2- एक लाख ते दोन लाख रुपये - पंधरा रुपये अधिक जीएसटी
3- दोन लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करायचा असेल तर - पंचवीस रुपये अधिक जीएसटी
एनईएफटी आणि आरटीजीएस म्हणजे नेमके काय?
आरटीजीएस आणि एन एफ टी या ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याचा सर्वात जलद प्रक्रिया असून याद्वारे पैसे एका खात्यातून दुसर्या खात्यात त्वरित हस्तांतरित केले जातात.
यापैकी आरटीजीएस हे दोन लाख किंवा त्याहून अधिक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जाते. त्याच वेळी एन एफ टी मध्ये पैसे हस्तांतरित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही.
ई सेवा ग्राहकांसाठी 24×7 उपलब्ध असून सरकारी सुट्टीच्या दिवशी देखील ही सेवा चालते.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:लूज कांदा विक्रीमुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन! कांद्याचा वांदा मिटणार
Published on: 28 May 2022, 09:57 IST