Others News

सर्वसामान्य लोकांसाठी पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत. यामध्ये अनेकांना याचा फायदा होत असतो. असे असताना आता पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट (RD deposit) खाते ही चांगली व्याजदरासह लहान हप्ते जमा करण्याची सरकारी हमी योजना आहे. तुम्ही फक्त 100 रुपयांच्या छोट्या रकमेतून गुंतवणूक (Investment) सुरू करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही, तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे जमा करू शकता. यामुळे ही योजना देखील फायदेशीर आहे.

Updated on 07 June, 2022 5:54 PM IST

यामध्ये खाते किमान पाच वर्षांसाठी उघडले जाते. बँका सहा महिने, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठी आवर्ती ठेव खात्यांची सुविधा देतात. यामध्ये, जमा केलेल्या पैशावर दर तिमाहीला व्याज मोजले जाते आणि ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी खातेदाराच्या ठेव रकमेत जोडले जाते. यामुळे तुमची रक्कम ही वाढतच जाते. याचा खातेदाराला फायदा होतो. यामध्ये वयानुसार अनेक योजना आहेत.

तसेच आरडी स्कीममध्ये (Post Office RD Scheme) 10 वर्षांसाठी दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8 टक्के व्याजदराने 16 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. यामुळे ही योजना फायदेशीर आहे. यामध्ये काही अटी देखील देण्यात आल्या आहेत. जर तुम्ही वेळेवर पैसे जमा केले नाहीत तर तुम्हाला दरमहा एक टक्का दंड भरावा लागणार होता. सलग 4 हप्ते चुकल्यानंतर खाते बंद केले जाते.

पेट्रोल, डिझेल होणार २० रुपयांनी स्वस्त, मोदी सरकारकडून दिलासा मिळणार

यामध्ये योजनेतील गुंतवणुकीवर टीडीएस कापला जातो. जमा केलेली रक्कम 40,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर वार्षिक 10 टक्के दराने कर आकारला जातो. तसेच, RD वर मिळणारे व्याज देखील करपात्र आहे, परंतु संपूर्ण मॅच्युरिटी रकमेवर कर आकारला जात नाही. FD प्रमाणे, कोणतेही करपात्र उत्पन्न नसलेले गुंतवणूकदार फॉर्म 15G भरून TDS सूटचा दावा करू शकतात.

महत्वाच्या बातम्या;
माळेगाव साखर कारखाना राज्यात सर्वात हायटेक, तोडणीपासून ते गाळपापर्यंत सगळंच स्मार्ट...
काय सांगता! खरिपाच्या तोंडावर खतांच्या पोत्याला फुलांचा हार, वाचा नेमकं काय आहे कारण..
दोन वर्षानंतर टोमॅटोने मालामाल केल्याने शेतकऱ्याने टोमॅटोच्या रोपाची काढली मिरवणूक

English Summary: Post Office Scheme; News work! New post office plan, pay Rs 10,000 and get Rs 16 lakh
Published on: 07 June 2022, 05:54 IST