सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि चांगल्या नफ्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या (post office) योजना फायदेशीर ठरू शकतात. पोस्ट ऑफिसच्या अशा काही स्कीम्स आहेत ज्या तुम्हाला कमी गुंतवणुकीत कमी कालावधीत करोडपती बनवू शकतात.
गुंतवणुकदार छोट्या ठेवी ठेवूनही करोडोंमध्ये निधी तयार करू शकतात. पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेत फक्त 417 रुपये जमा करून 1.03 कोटी रुपये जमा करू शकता.
पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मधील गुंतवणूकदार छोट्या ठेवींमध्येही करोडोंमध्ये निधी उभारू शकतात. याठिकाणी तुम्ही दररोज सुमारे 417 रुपये जमा करून 1.03 कोटी रुपये जमा करू शकता.
सावधान! 'या' कारणाने होऊ शकतो तुम्हाला डायबीटीस; अशी घ्या काळजी
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत व्याज किती मिळते
पोस्ट ऑफिस बचत योजना PPF दरवर्षी 7.1 टक्के चक्रवाढ व्याज देते. या योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षांचा आहे. त्यानंतर ते आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येईल. जर तुम्हाला १५ वर्षांनंतर पैशांची गरज नसेल, तर तुम्ही या फंडात पुढे जाऊ शकता. सरकारच्या या योजनेत तुम्ही दरवर्षी जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवू शकता.
तुम्ही एका वर्षात 1.50 लाख रुपये जमा करण्याऐवजी 12500 रुपये मासिक जमा करू शकता. म्हणजेच दररोज सुमारे 417 रुपये जमा करावे लागतील. याशिवाय, तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत PPF वर कर सूट देखील मिळू शकते. या योजनेत 22.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 वर्षांच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 18 लाख रुपयांचे व्याज मिळते.
पितृ पक्षा दरम्यान कावळ्यांना अन्न का दिले जाते? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि कथा
इतके व्याज मिळू शकते
तुम्ही या योजनेत दरमहा 12,500 रुपये गुंतवल्यास तुम्हाला एका वर्षात 1.50 लाख रुपये मिळतील. 15 वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये होईल, ज्यावर तुम्हाला वार्षिक 7.1 टक्के व्याजदर मिळेल. मॅच्युरिटीच्या वेळी एकूण कॉर्पस रु. 40.70 लाख असेल आणि रु. 18.20 लाख व्याज लाभ असेल. एकूण गुंतवणूक २५ वर्षांनंतर मॅच्युरिटीवर सुमारे रु. १.०३ कोटी मिळतील.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो मेथीच्या 'या' वाणांची शेती करा; 50 हजार रुपयांपर्यंत मिळेल उत्पन्न
शेतकऱ्यांनो येत्या 10 दिवसात जनावरांचा तातडीने विमा उतरवावा; राजू शेट्टींची मागणी
'या' जिल्ह्यात हळद संशोधन केंद्र उभारले जाणार; सरकारकडून 100 कोटींचा निधी उपलब्ध
Published on: 16 September 2022, 04:21 IST