Post Office Scheme : अनेकदा लोक स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चांगल्या भविष्यासाठी पैसे बचत (Money Saving) करत असतात. पैसे बचत करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात. एलआयसी पोस्ट ऑफिस (Post Office) यांसारख्या सरकारी वचक असलेल्या ठिकाणी अलीकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे.
अशा परिस्थितीत बरेच लोक पोस्ट ऑफिस योजना निवडतात. याचे कारण असे की ते पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक (Investment Tips) करताना जोखम ही जवळपास नगण्य असते त्याच वेळी पोस्ट ऑफिस च्या योजना गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा देतात.
खरं पाहता आजच्या महागाईच्या युगात सर्वसामान्यांसाठी बचत करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यामुळे बचत करू इच्छिणाऱ्या तसेच पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आजची ही बातमी खास राहणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 10 हजारांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर 16 लाख रुपये मिळणार आहेत. यासोबतच 5.8 टक्के दराने व्याज मिळणार आहे
हे पण वाचा :- Post Office Scheme : या नवीन पोस्ट ऑफिस योजनेचा लाभ घ्या, कमी बचत केली तरी लाखो रुपये मिळतील
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना
मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे पोस्ट ऑफिस आपल्या देशातील गुंतवणूकदारांसाठी संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या योजना चालवत असते. पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना हेदेखील पोस्टाच्या माध्यमातून चालवली जाणारी एक महत्वाची योजना आहे. मित्रांनो या योजनेद्वारे कमी गुंतवणुकीत सुद्धा तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस गुंतवणूकदारांना 5.8 टक्के व्याज दिले जात आहे. यासोबत चक्रवाढ व्याजदराने व्याज मिळणार आहे.
हे पण वाचा :- Business Idea : घरातूनच 'हा' व्यवसाय सुरु करा, दर महिन्याला 2 लाख रुपयांची कमाई होणार
आवर्ती ठेव योजनेत गुंतवणूक करा
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम 100 रुपये एवढी ठरवण्यात आली आहे आणि 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.
या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील बर
16 लाख रुपयांची रक्कम मिळविण्यासाठी, गुंतवणूकदारांना दरमहा 10 हजार रुपये जमा करावे लागतील. त्यामुळे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये 10 हजार रुपये संपूर्ण 10 वर्षांसाठी जमा करावे लागतील. याशिवाय, जर तुम्ही कोणताही हप्ता जमा करू शकत नसाल तर तुम्हाला 1 टक्के दंड भरावा लागेल आणि 4 वेळा हप्ते न भरल्यास तुमचे खाते बंद केले जाईल.
हे पण वाचा :- काय सांगता! या पट्ठ्याने टोमॅटोच्या एका झाडावर सर्वाधिक टोमॅटो पिकवण्याचा विक्रम बनवला, एकाच झाडाला लागले तब्बल 5,891 टोमॅटो
Published on: 07 September 2022, 02:35 IST