Others News

पिकांना योग्य वेळी पाण्याचा पुरवठा होणे खूप गरजेचे असते. परंतु आपल्याला माहीत आहेच की विजेचा लपंडाव हा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. बऱ्याचदा शेतांमध्ये दिवसा वीजपुरवठा न होता रात्रीच्या वेळेस होतो.

Updated on 11 July, 2022 12:12 PM IST

पिकांना योग्य वेळी पाण्याचा पुरवठा होणे खूप गरजेचे असते. परंतु आपल्याला माहीत आहेच की विजेचा लपंडाव हा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. बऱ्याचदा शेतांमध्ये दिवसा वीजपुरवठा न होता रात्रीच्या वेळेस होतो.

त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यायला जायला लागते. त्यामुळे बऱ्याच प्रकारच्या  प्राण्यापासून शेतकऱ्यांना धोका संभवतो.त्यामुळे शेताला दिवसा पाणीपुरवठा होणे खूप गरजेचे आहे.

याच पार्श्वभूमीवर सरकारच्या प्रधानमंत्री कुसुम घटक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा पिकांना सिंचन करणे शक्य व्हावे व पारंपारिक पद्धतीने कृषी पंप विज जोडणी साठी लागणाऱ्या खर्चात आणि अनुदानापोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचत व्हावी या उद्देशाने राज्यातील शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी उपलब्ध नाही.

नक्की वाचा:राष्ट्रीय व्यवस्थापन स्पर्धेत कृषि महाविद्यालय, पुणे येथील विद्यार्थ्याचे तामिळनाडू कृषि विद्यापीठात घवघवीत यश

अशा ठिकाणी पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाचे 30 टक्के अर्थसहाय्य उपलब्ध असून सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हिस्सा दहा टक्के आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हिस्सा पाच टक्के असणार आहे.

उरलेला 60 टक्के ते 65 टक्के हिस्सा राज्य शासनाचा असेल. शेतकऱ्यांच्या कृषी पंप विज जोडणी यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी शासनामार्फत गेल्या काही वर्षापासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबवण्यात येत आहेत.

नक्की वाचा:GST: 18 जुलैपासून महागणार 'या' गोष्टी, सर्वसामान्यांच्या खिशाला बसेल फटका, वाचा संपूर्ण यादी

संपूर्ण देशात राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षाऊत्थान महा अभियानाला गती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

योजना राज्यातील 34 ग्रामीण जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात हे अभियान महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महापूजा मार्फत राबविण्यात येत आहे.

ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी ऑनलाइन पोर्टल वर विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सादर करण्यासाठी  संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी केले आहे.

नक्की वाचा:ठाकरे सरकारच्या निर्णयाला धक्का! जलसंधारणाची 5 हजार कोटींची कामे शिंदे सरकारने केली रद्द

English Summary: Pm kusum yojana help to farmer to installed solar pump for water supply to crop
Published on: 11 July 2022, 12:12 IST