मागील बऱ्याच दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलया दरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली होती.त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला प्रचंड प्रमाणात झळ सोसावी लागली
या बाबतीत केंद्र सरकारवर प्रचंड प्रमाणात पेट्रोल दरवाढ कमी करण्यासाठी मागणी करण्यात येत होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मागच्या आठवड्यातकेंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात केली.
थोडा का होईना जनतेला दिलासा मिळाला परंतु आता या दर कपातीवरून वेगळेच संकट उभे राहिले असून केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात पेट्रोल पंप चालक मैदानात उतरले असून त्यांचा सरकारवर आरोप आहे की सरकारने केलेली ही कर कपात चुकीचे असून संबंधित आरोप फामपेडा या संघटनेने केला आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध म्हणून 31 मे रोजी कंपन्यांकडून कुठल्याही प्रकारचे इंधनाची खरेदी केली जाणार असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल चा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
केंद्र सरकारने जी कर कपात केली यामध्ये पेट्रोल अकरा रुपये 58 पैसे तर डिझेल आठ रुपये चौरस पैशांनी कमी झाले. परंतु फामपेढा या संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी दावा केला आहे की या निर्णयामुळे पेट्रोल पंप चालकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले.
त्यांनी सांगितले की येणाऱ्या 31 मे रोजी पेट्रोलियम कंपन्यांकडून कुठल्याही प्रकारचा इंधनाची खरेदी केली जाणार नाही. जो अगोदरचा साठा शिल्लक असेल तोपर्यंतच इंधनाची विक्री केली जाईल. सरकारने कोणतीही पूर्वकल्पना न देता व कोणतेही नियोजन न करता ही दर कपात केली आहे. त्यामुळे पंप चालक मालकांमध्ये नाराजी आहे.
या संघटनेच्या भूमिकेमुळे 31 मे रोजी राज्यातील इंधनाचा तुटवडा जाणवू याची भीती असल्यामुळे आदल्या दिवशी पंपावर इंधन भरण्यासाठी गर्दी होऊ शकते.31 मे ला इंधन पुरवठा वर विपरीत परिणाम होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:या' भांड्यामध्ये ठेवा दूध, उन्हाळा असो किंवा पावसाळा तरी खराब नाही होणार
Published on: 28 May 2022, 01:18 IST