Petrol Price Today: आतंरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये नरमाई दिसून येत आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर केले जातात. आजही नवीन दर जाहीर करण्यात आले आहे. पहा कुठे मिळत सर्वात स्वस्त पेट्रोल डिझेल....
ब्रेंट क्रूड (Crude Oil) आज आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरल $92 च्या आसपास आले आहे. $१३९ या वर्षाच्या उच्चांकावरून यामध्ये बरीच कमजोरी आली आहे. यूएस क्रूड देखील प्रति बॅरल $ 86 पर्यंत खाली आले आहे. मात्र देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही स्थिर आहेत. 17 ऑक्टोबरलाही तेल कंपन्यांनी दरात कोणताही बदल केलेला नाही.
देशाची राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे, तर 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये आहे. तर सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 84.10 रुपये प्रति लिटर आहे.
यावर्षी एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. तथापि, 22 मे रोजी सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे किंमती कमी झाल्या.
भाजीपाल्याचे भाव कडाडले! टोमॅटो 60 रुपये तर फ्लॉवर 150 रुपये किलो
प्रमुख शहरातील दर
- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
- कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
सर्वात स्वस्त आणि महाग पेट्रोल डिझेल
सर्वात स्वस्त पेट्रोल: पोर्ट ब्लेअरमध्ये 84.1 रुपये प्रति लिटर
सर्वात स्वस्त डिझेल: पोर्ट ब्लेअरमध्ये 79.74 रुपये प्रति लिटर
सर्वात महाग पेट्रोल: श्रीगंगानगरमध्ये 113.49 रुपये प्रति लिटर
सर्वात महाग डिझेल: श्रीगंगानगरमध्ये 98.24 रुपये प्रति लिटर
आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी EPFO खात्यात जमा करणार 56,700 रुपये, 7 कोटी खातेदारांना मिळणार फायदा
दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता
तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात.
BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.
महत्वाच्या बातम्या:
दिवाळीपूर्वी सोने खरेदीदारांची लॉटरी; सोने ६,००० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीनतम दर
शेतकऱ्यांनो प्रतीक्षा संपली! पीएम मोदी उद्या खात्यात जमा करणार 12 वा हप्ता, 16000 कोटी होणार खर्च
Published on: 17 October 2022, 10:06 IST