पेट्रोल डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात हळूहळू घसरण होत असताना पाहायला मिळत आहे. काल 25 जुलै रोजी पेट्रोल डिझेलचे 15 पैशांनी दर कमी झाले होते तर आज जवळपास 10 पैशांनी दर कमी झाले आहेत. आज मंगळवार, 26 जुलै रोजी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर (Diesel) स्थिर आहेत. दरम्यान, 14 जुलै रोजी महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती.
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.
हे ही वाचा
Crop cultivation! फायदेशीर लागवड; शेतकऱ्यांनो पावसाळ्यात 'या' पिकाची शेती करा व्हाल लखपती
महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
मुंबई 106.25 94.22
पुणे 105 92
नागपूर 106.03 92.58
नाशिक 106.74 93.23
हिंगोली 107.29 93.80
परभणी 108.92 95.30
धुळे 106.05 92.58
नांदेड 108.24 94.71
रायगड 105.96 92.47
अकोला 106.05 92.55
वर्धा 106.56 93.10
नंदुरबार 106.99 93.45
वाशिम 106. 37 93.37
चंद्रपूर 106.14 92.70
सांगली 105.96 92.54
जालना 107.76 94.22
हे ही वाचा
Benefit of Cultivation: शेतकऱ्यांनो 'ही' शेती करणार तुमच्या आयुष्याची दिवाळी, जाणून घ्या शेतीबद्दल..
पेट्रोल आणि डिझेलचे दर मोबाईलवर चेक करू शकता
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने (Indian Oil website) दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
Planting vegetables! शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात करा 'या' भाज्यांची लागवड; मिळेल भरघोस उत्पन्न
Fertilizer news; शेतकऱ्यांनो सावधान! खतामध्ये केली चक्क मिठाची भेसळ, चोरांनो कुठं फेडचाल हे पाप..
Cultivation of jojoba! जोजोबा शेतीतून शेतकरी होणार मालामाल; जाणून घेऊया हे पीक कसे पिकवणार..
Published on: 26 July 2022, 09:37 IST