Others News

Petrol Diesel Rate: सरकारी तेल कंपन्यांनी देशात दररोज प्रमाणे आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरीही देशातील नागरिकांना मात्र दिलासा मिळाला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Updated on 18 October, 2022 11:53 AM IST

Petrol Diesel Rate: सरकारी तेल कंपन्यांनी (State Oil Companies) देशात दररोज प्रमाणे आजही पेट्रोल आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरीही देशातील नागरिकांना मात्र दिलासा मिळाला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आजही, सरकारी तेल विपणन कंपन्या इंडियन ऑईल (IOC), BPCL आणि HPCL यांनी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत आणि त्यात कोणतीही कपात केलेली नाही. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

कच्च्या तेलाच्या किमती

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती आज मंदावल्या आहेत. ब्रेंट क्रूड $ 92 च्या खाली गेले आहे आणि आज प्रति बॅरल $ 91.69 वर आहे. याशिवाय, WTI क्रूड प्रति बॅरल $ 85.49 च्या दराने कायम आहे.

पीएफ खातेधारकांनो फक्त करा हे काम मिळतील 7 लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

चार महानगरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

दिल्ली- पेट्रोल 96.72 रुपये, डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई – पेट्रोल 111.35 रुपये, डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता- पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

अशा प्रकारे तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासा-

तुम्ही जर बीपीसीएलचे ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP<डीलर कोड> लिहा आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात.

देशात लम्पीचा कहर! ७० हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू; जाणून घ्या मृत्यूदर वाढतोय की कमी होतोय...

दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.

वेगवेगळ्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फरक का?

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता तेल विपणन कंपन्यांमार्फत जाहीर केले जातात, जे सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मूळ इंधनाव्यतिरिक्त उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत प्रचंड वाढते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅट (व्हॅल्यू अॅडेड टॅक्स) मुळे त्यांच्या किमतीही भिन्न असतात.

महत्वाच्या बातम्या:
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदी स्वस्त! 10 ग्रॅम सोने 29502 रुपयांना; पहा नवे दर...
महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग! अनेक ठिकाणी धो धो कोसळला, आजही अतिवृष्टीचा इशारा

English Summary: Petrol Diesel Rate: Crude oil fell! Has petrol and diesel become cheaper today?
Published on: 18 October 2022, 11:53 IST