Petrol Diesel Price Today: गेल्या काही दिवसांपासून आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. रशिया युक्रेन देशात इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. आज पुन्हा एकदा पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती जाहीर करण्यात आल्या आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी आज मंगळवार, 25 ऑक्टोबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न केल्याने सलग १५६ व्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. म्हणजेच आजही तेजचे भाव स्थिर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत. सध्या, WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 85 पर्यंत खाली आली आहे आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 91 च्या जवळ आले आहे.
यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.
धनत्रयोदशीच्या दिवशी या 5 गोष्टी ठेवा नेहमी लक्षात अन्यथा माता लक्ष्मी होईल नाराज
सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर विकला जात आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे.
तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पीएम किसान योजनेत केले हे बदल; जाणून घ्या नवीन नियम...
प्रमुख शहरातील दर
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
तिरुवनंतपुरम : पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
महत्वाच्या बातम्या:
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! EPFO ने जाहीर केला बोनस; जाणून घ्या तपशील
गव्हाच्या पेरणीसाठी आहे ही योग्य वेळ, होईल बंपर उत्पादन; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Published on: 25 October 2022, 09:55 IST