Petrol-Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने घसरत आहेत. असे असतानाही देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती कमी नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन सर्वच वस्तू महागल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करण्यात आल्या. आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर चार महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपयांना उपलब्ध आहे, तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे, जिथे किंमत 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये आहे.
आनंदाची बातमी! सरकार PF वरील व्याजदर वाढवणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली मोठी माहिती
देशातील कोणत्याही शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपयांना उपलब्ध आहे. त्याच वेळी, डिझेलची किंमत 94.27 रुपये आहे. चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर इथे पेट्रोलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये आहे.
21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise duty) प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.
इथे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळते
पोर्ट ब्लेअरमध्ये (Port Blair) सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. पेट्रोलची किंमत 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
यंदा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात होणार घट! मात्र कापूस, सोयाबीन आणि मका पिकात तेजी...
मुख्य शहरातील पेट्रोल डिझेलचे दर
दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.
तिरुवनंतपुरम : पेट्रोल १०७.७१ रुपये आणि डिझेल ९६.५२ रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.
महत्वाच्या बातम्या:
प्रतीक्षा संपणार! केंद्रीय कर्मचाऱ्यांना या दिवशी मिळणार गोड बातमी; होणार मोठा फायदा
नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटची नवीनतम किंमत
Published on: 26 September 2022, 10:29 IST