Others News

Petrol Diesel Price Today: देशात महागाईचा आलेख वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शंभरी पार गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत.

Updated on 15 October, 2022 10:26 AM IST

Petrol Diesel Price Today: देशात महागाईचा (inflation) आलेख वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) किमती शंभरी पार गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती कमी झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किमतीत सतत घसरण होत असताना भारतीय तेल विपणन कंपन्यांनी (Indian Oil Marketing Companies) नेहमीप्रमाणे आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले. मात्र, भारतीय तेल कंपन्यांनी शनिवारी (१५ ऑक्टोबर) पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत.

अशाप्रकारे आज सलग १४७ वा दिवस आहे जेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. महागाईच्या आघाडीवर आजही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आज शनिवार 15 ऑक्टोबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न केल्याने सलग 147 व्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. म्हणजेच आजही तेजचे भाव स्थिर आहेत.

शेतकऱ्यांना भीक नको, कुत्रे आवरा... रक्षकच झाले भक्षक! जिल्ह्याधिकारी कार्यालयावर शेतकऱ्याने लावलं पोस्टर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 89 पर्यंत वाढली आहे आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 96 च्या जवळ आले आहे.

यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.

यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली. सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर विकला जात आहे.

त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान! या रोगापासून करा लिंबाचा बचाव अन्यथा होईल मोठे नुकसान

आजची किंमत किती आहे

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

तिरुवनंतपुरम : पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.

महत्वाच्या बातम्या:
मुसळधार पावसाने मोडले सोयाबीन उत्पादकांचे कंबरडे! पावसामुळे सोयाबीन खराब; शेतकरी संकटात
राज्यात परतीच्या पावसाचे थैमान! शेतीला मोठा फटका; शेतकरी चिंतेत

English Summary: Petrol Diesel Price Today: Crude oil prices fell on the occasion of Diwali!
Published on: 15 October 2022, 10:26 IST