Others News

Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण होताना पाहायला मिळत आहे. दररोजच्या प्रमाणे आजही सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Updated on 20 October, 2022 9:32 AM IST

Petrol Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण होताना पाहायला मिळत आहे. दररोजच्या प्रमाणे आजही सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल आणि डिझेलचे (Diesel) नवीन दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांनी आज गुरुवार, 20 ऑक्टोबरसाठी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर जाहीर केले. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न केल्याने सर्वसामान्यांना सलग १५२ व्या दिवशी दिलासा मिळाला आहे. म्हणजेच आजही तेजचे भाव स्थिर आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत सातत्याने घसरण होत आहे. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 85.61 आणि ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 91.63 च्या जवळ आली आहे.

अजित पवार मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार! राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची करणार मागणी

यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात (Excise duty) कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.

Tomato price: टोमॅटो उत्पादकांना दिलासा! टोमॅटोचे भाव 60 रुपयांच्या पार

प्रमुख शहरातील दर

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

तिरुवनंतपुरम : पेल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.

महत्वाच्या बातम्या:
EPF ट्रान्सफर प्रक्रिया आणखी झाली सोपी, आता तुम्हाला फॉर्म-13 भरावा लागणार नाही; जाणून घ्या प्रक्रिया...
कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, DA नंतर आता प्रवास भत्ताही वाढवला

English Summary: Petrol Diesel Price: New prices of petrol-diesel have been announced by oil companies!
Published on: 20 October 2022, 09:32 IST