Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार गेल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. देशात महागाईचा आलेख वाढतच चालला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) वाढीचा परिणाम वाहतूक क्षेत्रावर होऊन देशातील सर्वच जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दररोज नवीन भाव जारी केले जातात. आजही नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.
पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलत असतात. काही दिवस पेट्रोलच्या किमतीत वाढ होते, तर कधी भावात मोठी घसरण होते. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत सातत्याने वाढ होत असताना भारतीय तेल विपणन कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत.
पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर शुक्रवारी जाहीर करण्यात आले. बिहार राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडीशी नरमाई आहे. त्याचबरोबर देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
कच्च्या तेलात अस्थिरता असूनही, महाराष्ट्र आणि मेघालय वगळता बंगाल, राजस्थान, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, यूपीसह सर्व राज्यांमध्ये इंधनाचे दर 146 व्या दिवशी स्थिर राहिले. नवीन दरानुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे, तर सर्वात महाग तेल राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये आहे.
हिवाळ्यात टोमॅटोच्या शेतीपासून मिळेल बक्कळ पैसा; करा या अस्सल जातींची लागवड
इथे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळते
पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. जिथे पेट्रोलची किंमत 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
मुख्य शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
तिरुवनंतपुरम : पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! आजच UPSC च्या या भरतीसाठी करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर...
त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.
महत्वाच्या बातम्या:
सोने खरेदीला करू नका उशीर, 10 ग्रॅम सोने मिळतंय फक्त 29758 रुपयांना; पहा 14 ते 24 कॅरेटचे दर...
आता पीएम किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार? भारतीय किसान संघ काढणार रॅली
Published on: 14 October 2022, 10:50 IST