Petrol Diesel Price: रशिया युक्रेन युद्धापासून देशात महागाईचा (inflation) भडका उडाला आहे. इंधनाचे दर (Fuel rates) गगनाला भिडल्यामुळे त्याचा परिणाम वाहतूक क्षेत्रावर झाला आणि सर्वच जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. पेट्रोल (Petrol) डिझेलच्या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. तसेच घरगुती गॅसच्या किमतीही वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट ढासळले आहे.
इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (Indian Oil Marketing Companies) नेहमीप्रमाणे आज पेट्रोल आणि डिझेलचे (Diesel) नवीनतम दर जाहीर केले आहेत. मात्र, भारतीय तेल कंपन्यांनी रविवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत.
अशाप्रकारे आज सलग 99 वा दिवस आहे जेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महागाईच्या आघाडीवर आजही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे.
PM Kisan: सावधान! उरले फक्त 2 दिवस; करा हे काम अन्यथा मिळणार नाहीत पीएम किसानचे पैसे
सरकारी तेल कंपन्यांनी रविवार 28 ऑगस्टसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न केल्याने सर्वसामान्यांना सलग ९९व्या दिवशी दिलासा मिळाला आहे.
म्हणजेच आजही तेजचे भाव स्थिर आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या, ब्रेट क्रूड (Crude Oil) प्रति बॅरल सुमारे $100 आहे. यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात (Excise duty) कपात केली होती.
पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.
जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य! “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच"
सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर विकला जात आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
या कारणामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.
प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे दर
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
तिरुवनंतपुरम : पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
महत्वाच्या बातम्या:
Gold Price Today: सोने खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! सोने 4500 रुपयांनी तर चांदी 24300 रुपयांनी स्वस्त...
Maharashtra Rain Update: राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अलर्ट जारी
Published on: 29 August 2022, 10:05 IST