Others News

Petrol Diesel Price: रशिया आणि युक्रेन युद्धापासून देशात महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार गेल्याने वाहतुकीवर परिणाम होऊन जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. आज पुन्हा पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.

Updated on 10 October, 2022 11:14 AM IST

Petrol Diesel Price: रशिया आणि युक्रेन युद्धापासून देशात महागाईचा (inflation) भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार गेल्याने वाहतुकीवर परिणाम होऊन जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. आज पुन्हा पेट्रोल (Petrol) डिझेलचे (Diesel) नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी, सरकारी तेल कंपन्यांनी (Indian Oil Corporation) पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत. आजही तेलाच्या किमतीत दिलासा मिळाला आहे. म्हणजेच आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की मागील वेळी 21 मे रोजीच इंधनाच्या किमतीत (Fuels Rate) बदल करण्यात आला होता. तेव्हापासून तेलाच्या किमती स्थिर आहेत. अशा परिस्थितीत, जाणून घ्या आज तुमच्या शहरातील नवीनतम दर काय आहेत.

शेतकऱ्यांमागील साडेसाती हटेना! मिरची उत्पादक अडचणीत; पावसामुळे लाल मिरची काळी पडल्याने मोठे नुकसान

मुख्य शहरातील दर

दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.

मुंबई: पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई: पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24  रुपये प्रति लिटर.

हैदराबाद: पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

तिरुवनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.

दिवाळीच्या तोंडावर सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर! सोने 4300 तर चांदी 19000 रुपयांनी स्वस्त...

दररोज सकाळी 6 वाजता तेलाचे दर जाहीर होतात

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर होत असल्याची माहिती आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत व्हॅट, डीलर कमिशन, एक्साईज ड्युटी आणि इतर अनेक गोष्टी जोडल्यानंतर किमती जाहीर केल्या जातात.

आपण याप्रमाणे नवीनतम किंमत जाणून घेऊ शकता

तुम्हालाही पेट्रोल आणि डिझेलची नवीनतम किंमत जाणून घ्यायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला फक्त एक एसएमएस करावा लागेल. होय, यासाठी तेल कंपन्यांकडून विशेष सुविधा दिल्या जातात.

तुम्ही इंडियन ऑइल (IOC) चे ग्राहक असल्यास, पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला RSP<डीलर कोड> लिहून ९२२४९९२२४९ वर एसएमएस पाठवावा लागेल. याशिवाय, HPCL ग्राहक 9222201122 वर एसएमएस HPPRICE <डीलर कोड> आणि BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर टाइप करून माहिती मिळवू शकतात.

जर तुम्हाला मुंबईचा इंधन दर जाणून घ्यायचा असेल, तर तुम्हाला RSP स्पेस 108412 (मुंबईचा डीलर कोड) लिहून 92249 92249 वर पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाणून घेऊ शकाल.

महत्वाच्या बातम्या:
राज्यात मुसळधार मान्सूनचे सत्र सुरूच! या भागांना यलो अलर्ट जारी
Big Breaking: माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

English Summary: Petrol Diesel Price: Decline in crude oil price! Find out the new rates
Published on: 10 October 2022, 11:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)