Others News

रासायनिक खताच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते हे खरे परंतु हि उत्पादन वाढ काही तात्पुरत्या स्वरूपाची असते किंवा काही मर्यादित स्वरूपाची असते. अशा प्रचलित आधुनिक शेतीचे अनेक दुष्परिणाम आता मोठ्याप्रमाणावर जाणवू लागले आहेत. भारताची सुमारे 65% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. तरी रासायनिक खतांच्या वापर गरजेपेक्षा अधिक होत आहे.

Updated on 28 February, 2021 8:20 PM IST

रासायनिक खताच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते हे खरे परंतु हि उत्पादन वाढ काही तात्पुरत्या स्वरूपाची असते किंवा काही मर्यादित स्वरूपाची असते. अशा प्रचलित आधुनिक शेतीचे अनेक दुष्परिणाम आता मोठ्याप्रमाणावर जाणवू लागले आहेत.

भारताची सुमारे 65% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. तरी रासायनिक खतांच्या वापर गरजेपेक्षा अधिक होत आहे. अशाप्रकारे रासायनिक पदार्थाचा अनिष्ट परिणाम खालील प्रमाणे:

  • जमिनीचा पोत बिघडतो, परिणामी जमिनीच्या उत्पादकता कमी होते.
  • रासायनिक खतांच्या जास्त वापरामुळे पिकांना पाणी जास्त प्रमाणात द्यावे लागते.
  • कीटकनाशकांच्या वापरामुळे अनिष्ट परिणाम होतात यात उपद्रव्यकारक कीटक मारतात त्याचप्रमाणे काही उपयुक्त जीव जंतूही बळी पडतात. रासायनिक पदार्थाच्या वापरामुळे जमिनीच्या पोतावर होणार दुष्परिणाम टाळणे या खताचा पिकाच्या दर्जावर व पर्यायाने आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे या उद्धेशातुन सेंद्रिय शेती ही संकल्पना पुढे आली.

हेही वाचा:महिलेने दाखवला सेंद्रिय शेतीचा मार्ग; आता होतोय तीन हजार शेतकऱ्यांना फायदा

जमिनीची सुपीकता शाश्वत ठेवायची असेल तर सेंद्रिय खतांचा/पदार्थांचा वापर पिकांमध्ये व फळझाडांमध्ये करणे आवश्यक आहे. त्यामध्ये जनावरांचे मलमूत्र, संजीवनी, हिरवळीचे खत, गांडूळ खत, इत्यादीचा वापर जरुरीचा ठरेल. 

सेंद्रिय संजीवनी:

सेंद्रिय संजीवनी तयार करण्यासाठी जनावरांचे 200 किलो शेण त्यात 25 किलो सुपर फॉस्पेट टाकून लाकडी काटीच्या सहाय्याने ते चांगले एकजीव करून घ्यावे आणि हे तयार झालेले मिश्रण खताच्या रिकाम्या गोण्यात भरून त्यांची तोंडे बांधावीत व त्या गोण्या 30 दिवसापर्यंत सावलीत ठेवाव्यात. साधरणता 30 दिवसात सेंद्रिय खत तयार होते. ते खत चहा पावडर सारखे बनते यालाच सेंद्रिय संजीवनी म्हणतात.

फायदे

  • जमिनीची पोत टिकवता येतो.
  • जमिनीतील सूक्ष्म जिवाणूच्या संख्येत वाढ होते.
  • जमिनीतील पाणी धारणा करण्याची क्षमता वाढवता येते.
  • पिक उत्पादन सुद्धा वाढवता येते.

 

हिरवळीचे खते:

दोन पद्धतीने हिरवळीचे खत तयार करतात. जमिनीत ताग, धैंचा इत्यादी पिके पेरून साधारण 10% फुलोऱ्यात असताना नांगराच्या साहाय्याने जमिनीत गाडून टाकावीत व त्या जमिनीमध्ये पाणी सोडावे. शेताच्या बांधावर सुबाभूळ, गिरीपुष्प व इतर झाडाच्या कोवळ्या फांद्या वनस्पतीचे अवशेष जमिनीवर टाकून नांगराच्या साहाय्याने जमिनीत गाडून टाकावे व पाणी सोडावे या हिरवळीच्या खतांच्या वापरामुळे जमिनीची पाणी धरण्याची शक्ती वाढून पिकास पोषक अन्न द्रव्याची उपलब्धता वाढते.

गांडूळ खत:

गांडूळाच्या नैसर्गिक कार्य करण्याच्या सवयीचा उपयोग सेंद्रिय पदार्थपासून तयार झालेले खत म्हणजे गांडूळ खत होय. यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम, संजीवके व सूक्ष्मद्रव्य इत्यादी शेणखताच्या तुलनेत जास्त असते. मराठीमध्ये गांडूळांना दानवे, वाळ, केचवे, शिदोढ, काडुक किंवा भूनाग या नावाने देखील ओळखले जातात. गांडूळाच्या 3000 जाती असून भारतामध्ये 300 जातीचे गांडूळे आहेत. गांडूळ खत निर्मितीसाठी इसिनीया फोइटिडा या जातीचा वापर करतात. अशाप्रकारे सर्व जैविक पदार्थांचा वापर करून शेती कसावी, आजच्या घडीला सेंद्रिय शेतीतील उत्पादनाला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळताना दिसते आहे. 

ज्योती जाधवर, वैशाली पाडेकर व विशाखा बागुल
M.Sc (Agri), कृषी महाविद्यालय, लातूर

English Summary: Organic Farming future need
Published on: 21 March 2019, 03:54 IST